पांदण रस्त्याचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातर्गत येणाऱ्या मौजा खरबी तरोडी (खुर्द)गावातील शिव पांदण रस्त्याच्या अतिक्रमनाचा विषय गेल्या कित्येक दिवापासून मार्गी लागत नसल्याने नाहक त्रास भोगावा लागत आहे तेव्हा मौजा खरबी तरोडी (खु) खसरा क्र. १७,२८,२९,३०,३१,३३,३४ समोरील शिव पांधन चे अतिक्रमण त्वरित काढण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद नागपूर चे महिला व बालकल्याण समिती सभापती प्रा. अवंतिका  लेकुरवाडे व कामठी पंचायत समितीचे माजी उपसभापती आशिष मललेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसिलदार अक्षय पोयाम यांना आज सामूहिक निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी मनीष वाघ, राहुल पुंड, किशोर रहाटे, नरेंद्र मिश्रा, लेखराम यादव, विनोद हजारे, गजानन वरखडे, सुरेंद्र देवगडे, दिलीप गावंडे, रवी मानापुरे, हरिदयारम यादव, घनश्याम पदमगीवर, राजेश शर्मा, गजानन शेंडे, आणि नवदुर्गा नगर तरोडी खू. येथील समस्त नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवीन कामठी पोलिसांनी दिले 23 गोवंश जनावरांना जीवनदान..

Mon Mar 6 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 6 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आवंढी मार्गे सहा चाकी आयसर ने अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करीत असलेल्या वाहनावर नवीन कामठी पोलिसांनी वेळीच धाड घालून सदर वाहनाने कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेत असलेल्या 23 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही मध्यरात्री 4 दरम्यान केली असून या धाडीतून जप्त केलेले सहाचाकी आयसर किमती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com