– दोन्ही सबरसिबल पंप सह एकुण २०५५० रू. चा मुद्देमालाची चोरी.
कन्हान :- मौजा खंडाळा (घटाटे) शेत शिवारातील शेतात पाणी सिंचन करणा-या दोन विहिरीतील दोन समरसिबल पंप किमत २०५५० रूपयाचे कुणीतरी चोरून नेल्याने शेत मालकांच्या तोंडी तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपी शोध कन्हान पोलीस करित आहे.
मौजा खंडाळा (घटाटे) शिवारात खसरा क्र. १६९/०२ येथे कुणाल पृथ्वीराज रहांगडाले वय ३४ वर्ष शेत मालक यांचे २.०९ हेक्टर (५.५ एकर) शेती असुन सदर शेतीत विहिर व शेतीला पाणी सिंचन कर ण्याकरिता समरसीबल पंप ३एचपी चा एयोमैन कपनी चा पंम्प लावला होता. ही शेती मित्र सुनिल ज्ञानदेव वानखेडे वय ४० वर्ष रा. खंडाळा यास ठेक्याने दिली असुन ते सदर शेती व विहीरीची देखभाल करित होते. रविवार (दि.१) डिसेंबर ला लाखनी येथे कामाने गेलो असता दुपारी १.१५ वाजता मित्र सुनिल यांनी फोन करून सांगितले कि, शनिवार (दि.३०) नोहेंबर ला सायंकाळी ५ वाजता विहीरीकडे जावुन पाहिले अस ता पाण्याचा पंप दिसला होता. त्यांनंतर घरी जावुन जेवन वगैरे करून झोपलो. रविवार (दि.१) डिसेंबर ला दुपारी १ वाजता शेतात गेलो तर विहिरीतील शेताला पाणी देणारा १) समरसीबल पंप ३ एचपी एयोमैन कंपनीचा पंप अंदाजे किमत ७५०० रू., २) मोटार पाईप ५ फिट १०० रु., ३) २.५ एमएम जेके केबल कि.८०० रु, ४) मशीन नट बोल्ट कि. १५० रू. असा एकुण ८५५० रु. चा माल दिसला नसुन शोध घेतला असता मिळुन आला नाही. तसेच खंडाळा (घटाटे) शिवारातील खसरा क्र २०२/०२ शेत मालक विकास एकनाथजी हटवार यांच्या विहिरीतील सेवा कंपनीची ३ एचपी १) समरसिबल पम्प किमत ८५०० रू.,२) स्टार्टर कि.१००० रू., ३) ३ पीएच आटो स्विच कि. २००रू., ४) ग्री कि.१५० रू.,४) सक्शन पाईप २ इंच ३० फिट कि.१००० रू., ५) एमसीबी ३२ एम्पीअर कि.२५० रू., ६) एल्युमिनियम केबल ८ एमएम, १५ मिटर कि.२०० रू., ७) २.५ एमएम २२ मीटर कि. ७०० रू. असा एकुण १२००० रू. चा माल दिसुन आला नाही. या दोन्ही शेताला पाणी सिंचन विहिरी तील समरसिबल पंप एकुण किमत २०५५० रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी चोराने चोरून नेल्याने त्यांचे विरूध्द शेत मालक कुणाल पृथ्वीराज रहांगडाले वय ३४ वर्ष रा. प्लॉट नं. ६८ महेश कॉलोनी चंदननगर मेडिकल चौकाजवळ नागपुर यांनी पोस्टे ला तोंडी तक्रार दिल्याने कन्हान पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात हेकॉ जयलाल सहारे हयानी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपी चा शोध कन्हान पोलीस करित आहे.