नागपूर :- बोखारा येथील जयवंत गोपाळराव खापरे वय वर्ष 66 असून हे गृहस्त गेल्या 12 वर्षांपासून बोकारा येथील बजरंगनगर वार्ड नंबर 3 साईप्रसाद हाउसिंग सोसायटीमध्ये राहत आहे. मानव कल्याण सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या मार्फत राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश सिंह ठाकुर यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिसमध्ये निवेदन दिलेत. व प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये घरकुल मिळावं याकरिता 17 फेब्रुवारी 2021 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म पुटक केलेला होता. फॉर्मचा नंबर आहे ‘ 4845 असे निवेदन दिले होते. परंतु या निवेदनाची अजूनही काही कारवाई झालेली नाही. सध्या नागपुरात वादळी पाऊस सुरू झाला तेव्हापासून यांच्या घरात घराची भिंत कोसळली आणि पुढेही त्यांच्या घरातील जीव धोक्यात आहे. यांना घरकुल मिळावं याकरिता न्यायाची मागणी करीत आहे.
घरकुल मिळावं याकरिता त्यांच्या नावाची शासनाने मंजुरी दिली असून अडथळा निर्माण होत आहे. परंतु तेथील कर्मचारीगण घटकुल योजनेच्या कामांमध्ये अडथळा निर्माण करत आहे. यावर कारवाई झाली पाहिजे कारण NIT ने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायती बाहेरील ले-आऊटच्या भूखंड धारकांना एनआयटी कडून 1.5 ते ₹ 200000 ची मागणी भरावी लागेल आणि नकाशा मंजूर करावा लागेल त्यानंतरच ते या योजनेचे लाभार्थी होतील. घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजनांची माहिती एनआयटी कडून प्राप्त झाली आहे. पंतप्रधान घरकुल आवास योजनेत बोखारा येथील रहीवांसानी एकूण 33 लोकांनी फॉर्म भरलेले होते. त्यापैकी 8 लोकांना घरकुल शासनातर्फे मंजूर झाले होते.
त्या 8 पैकी गावंठाण्यात दोघांना घरकुल दिले. आणि गावंठाणाच्या बाहेर असलेले 3 लोकांना अद्यापही घरकुल मिळालं नाही. यामागे NMRDA येथील कर्मचारी अडथळा निर्माण करीत आहे. असा चक्क आरोप जयवंतराव खापरे यांनी लावलेला आहे. गरिबांना घरकुल मिळत नाही मग या योजनेचा फायदा काय ? घरकुल मिळण्या करिता दीड ते 2 लाखा रुपये भरावे लागतात तर हे गरीब लोक कुठून पैसे भरणार तर या घरकुल योजनेचा फायदा काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.