संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या भाजी मंडी परिसरातील त्रिकोणी चौकातील निर्माणाधिन कार्यरत धोबीघाट ची जागा ही नगर परिषद च्या डी पी प्लॅन मध्ये आरक्षण क्र 11 नुसार पोलीस विभागासाठी आरक्षित असल्याचे नमूद आहे त्यानुसार कार्यरत असलेल्या धोबी घाट च्या ठिकाणी पोलीस विभागाचे कार्यालय करण्याहेतु संबंधित पोलीस विभाग ,नगर परिषद प्रशासनाने संयुक्त पाहणी करीत जागेचा आराखडा घेतला होता.आता या धोबी घाट च्या ठिकाणी पोलीस विभागाचे कार्यालय उघडणार मात्र त्यांना प्रशासनातर्फे पर्यायी व्यवस्था करून देण्याचे कुठलेही आश्वासीत नसल्याने धोबी समुदायाच्या व्यवसायिकावर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहत व्यवसायावर गंडांतर आणल्या जात होते एकीकडे नगर परिषद, पोलीस प्रशासनाची एकाधिकारशाही तर दुसरीकडे धोबी समुदायातील व्यावसायिकांचा न्यायिक लढा ..या दोघांवर उत्तम तोडगा काढण्याच्या उद्देशाने माजी पालकमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार प्रविण दरेकर यांनी आज 21 जून ला कामठी नगर परिषद ला भेट देत विकास आराखड्याची पाहणी करीत धोबी समुदायाच्या व्यवसायिक प्रश्न व उदरनिर्वाहाचा मुद्दा गांभीर्याने लक्षात घेत सदर धोबी घाट वर पोलीस विभागाचे असलेले आरक्षण रद्द करून ती जागा डी पी प्लॅन मध्ये आरक्षण क्र 11 धोबी घाट साठी आरक्षित करा त्यालागतच्या भाजी मंडी ची जागा पोलीस विभागासाठी आरक्षित करा तसेच आरक्षण क्र 51 मधील गोरक्षण शाळेची जागा ही बगीच्यासाठी आरक्षित आहे हे बगीच्याचे आरक्षण रद्द करून ती जागा डी पी प्लॅन मध्ये गोरक्षण शाळेसाठी आरक्षित करण्याचे आदेशीत केले.त्यानुसार मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी हे तिन्ही प्रस्ताव पुढच्या सभेत मंजूर करून सदर जागेचे आरक्षण ठरलेल्या जागेसाठी आरक्षित करणार असल्याचे जाहीर केले.
धोबीघाट च्या जागेचा औचित्याचा मुद्दा हा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने मार्गी लागला व धोबी समुदायाच्या व्यवसायिकावर आलेले गंडांतर टळले त्यामुळे समस्त धोबी समुदायाच्या वतीने आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाच्या जयघोषाची गर्जना करीत सामूहिक आभार मानण्यात आले.
कामठी नगर परिषद मध्ये आमदार प्रवीण दरेकर तसेच आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीत प्रशासकीय अधिकारी प्रशासक संजय पवार, मुख्याधिकारी संदीप बोरकर, विक्रम चव्हाण,तहसीलदार अक्षय पोयाम, भूमी अभिलेख अधिकारी, प्रदीप भोकरे ,रुपेश जैस्वाल आदी अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते तसेच कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष अजय कदम, माजी नगरसेवक संजय कनोजिया,माजी नगरसेवक श्रावण केळझरकर, माजी नगरसेवक कपिल गायधने,माजी नगरसेवक लालसिंग यादव, माजी नगरसेवक प्रतीक पडोळे,लाला खंडेलवाल,विजय कोंडुलवार, पंकज वर्मा, उज्वल रायबोले, राकेश कनोजिया, मुकेश कनोजिया आदी उपस्थित होते.