संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-प्रभाग 15 अंतर्गत येणाऱ्या महावितरण ऑफिस रोड वरील स्ट्रीट लाईट पोल देखभाल दुरुस्ती अभावी रविवारी दुपारी कोसळला सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
महावितरण ऑफिस मार्गवर शिवनगर ते विक्तु बाबा नगर दरम्यान 25 स्ट्रीट लाईट पोल लावण्यात आले पोल ची देखभाल दुरुस्ती नगर परिषद विद्युत विभाग कडे आहे.
पोल पड़ल्याची तक्रार नगर परिषद कडे केल्या नंतरही काहीही कार्यवाही करण्यात आली नाही असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे.