राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 9.22 लाख किंमतीचा मद्य साठा जप्त

मुंबई :- उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सायन पूर्व येथील धीरज आयर्न अँड स्टील लि, ऑफीस नं. जी २१, लोकमान्य पान बाजार असोशिएशन, सोमय्या हॉस्पिटल रोड, पूर्व द्रुतगती मार्गाजवळ परदेशात निर्मित केलेल्या व गोव्यातून आयात करुन मुंबईत आणलेल्या विविध ब्रँन्डच्या विदेशी मद्याचा साठा छापा टाकीत जप्त केला आहे. हा मुद्देमाल एकूण 9 लाख 22 हजार 196 रूपये किंमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील आहे.

या गुन्ह्यापोटी संतोष ऋषी घरबिडी (वय 42) या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 165 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीदेखील परदेशातून, दिल्ली आणि गोवा, महाराष्ट्रात आयात केलेल्या विविध बँन्डच्या विदेशी स्कॉच मद्याच्या सिलबंद बाटल्यांची मुंबई मध्ये विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हे नोंद केलेले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, ठाणे शहर अधीक्षक प्रविण कुमार तांबे, मुंबई शहर उपअधिक्षक सुधीर पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकसभा निवडणूक आचार संहितेचे गांभीर्य लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे. ही कारवाई मुंबई शहर पथक क्रमांक 1 या पथकातील निरीक्षक कैलास तरे यांनी केली असून दुय्यम निरीक्षक रवींद्र जाधव, दुय्यम निरीक्षक रोहित आदलिंगे तसेच जवान विक्रम कुंभार, नरेश वडमारे यांनी सहकार्य केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक तरे करीत आहेत, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी घेतले जगदंबेचे दर्शन 

Fri May 3 , 2024
कोराडी :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरवरून, थेट महाजगदंबेच्या चरणी लीन झाले, मोठ्या भक्तीभावाने पुजा-अर्चना केल्यानंतर, मंदीर संस्थानच्या आँफीस मध्ये उपाध्यक्ष अजय विजयवर्गीय, व विश्वस्त अशोकराव खानोरकर यांनी त्यांना आई जगदंबेची फोटो भेट दिली. प्रेसच्या प्रतिनिधी सोबत वार्ताकार्यक्रमात सरसंघचालकांनी सांगीतले की, देश्याची एकता-अखंडता, सर्वसमाजात समभाव वाढीसलागावा बंधुभावाने, एकोप्याने सकलहिंदू सगळ्या वर्गांना सोबत घेवुन चालावे यासाठी आपण मातेला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com