आदिवासी दिव्यांग मुलाला शाळेत शिक्षिकेकडून अमानुष वागणूक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी – नागपूर मार्गावरील भिलगाव नाका नंबर दोन कवठा परिसरातील सीबीएसई शाळेत पाचव्या वर्गात शिकत असलेल्या आदिवासी दिव्यांग विद्यार्थ्याला शिक्षिकेने चक्क उन्हात दीड तास उभे ठेवून अमानुष शिक्षा दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून यासाठी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्याला चक्क शाळेतून आठवड्या भऱ्यासाठी निलंबित केले आहे प्राप्त माहितीनुसार आर्यन सुरेश राठोड हा माउंट लीटरा झी स्कूल कवठा या शाळेत पाचवा वर्गात शिकत असून अचानक आजारी पडल्याचे शाळेतून दोन दिवसांपूर्वी वडील सुरेश राठोड याना फोन आला असता त्यांनी शाळेत जाऊन चौकशी केली असता आर्यन उलट्या करीत होता तेव्हा वडिलांनी त्याला ओआरएस देत नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आर्यानची प्रकृती बिघडल्या संदर्भात वडील सुरेश राठोड शाळेत जाऊन चौकशी केली असता शिक्षिकेने आर्यनला दीड तास उन्हात उभे ठेवले आर्यनने पाणी मागितले असता त्याला पाणीसुद्धा दिले नाही त्यामुळे आर्यनची प्रकृती बिघडली असल्याचे दिसून आले आर्यनचे वडील सुरेश राठोड शाळेत जाऊन आर्यनच्या संदर्भात विचारपूस करू लागले असता शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका रासी इराणी यांनी दिनांक 7 ते 14 नोव्हेंबर पर्यंत आर्यनला शाळेतून निलंबित (सस्पेंड) केल्याचे पत्र दिले आहे आर्यनची प्रकृती खालावली असून त्याला खाजगी रुग्णालयातून आता शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ,विशेष आर्यन 42 टक्के दिव्यांग असताना शिक्षिका, प्राचार्य ,व्यवस्थापनाने अशा प्रकारची वागणूक देणे की कितपत योग्य आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणाने इतर पालकही दहशतीत आले आहेत.
शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका रासी इराणी व शाळेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी हार्दिक शाह यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
शाळेकडून आदिवासी दिव्यांग विद्यार्थ्याला मिळणाऱ्या अमानुष वागणुकीमुळे त्याचे आरोग्य धोक्यात आले आहेत याबाबत  कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप नागपुरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तक्रार प्राप्त झाली असून आपण चौकशी योग्य कारवाई करणार असल्याचे सांगितले आहेत

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com