राज्य मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर

मुंबई :- राज्य मंत्रिमंडळांचे खातेवाटप 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाचे खाते वाटप पुढील प्रमाणे-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (अपारंपारिक ऊर्जा वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)

उपमुख्यमंत्री अजित पवार : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क.

मंत्री 

चंद्रशेखर बावनकुळे : महसूल

राधाकृष्ण विखे – पाटील : जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)

हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण

चंद्रकांत(दादा) पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य

गिरीश महाजन : जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.

गणेश नाईक : वने

गुलाबराव पाटील: पाणी पुरवठा व स्वच्छता.

दादाजी भुसे: शालेय शिक्षण.

संजय राठोड : मृद व जलसंधारण.

धनंजय मुंडे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण.

मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता.

उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा

जयकुमार रावल : पणन, राजशिष्टाचार.

पंकजा मुंडे : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन.

अतुल सावे : इतर मागास बहूजन कल्याण, दूग्धविकास, अपारंपारिक उर्जा

अशोक उईके : आदिवासी विकास.

शंभूराज देसाई : पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.

अॅड.आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य.

दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.

आदिती तटकरे : महिला व बालविकास.

शिवेंद्रसिंह भोसले : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).

अॅड. माणिकराव कोकाटे : कृषी.

जयकुमार गोरे : ग्रामविकास व पंचायतराज.

नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन , विशेष सहाय्य.

संजय सावकारे : वस्त्रोद्योग.

संजय शिरसाट : सामाजिक न्याय.

प्रताप सरनाईक : परिवहन

भरत गोगावले : रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास.

मकरंद जाधव-(पाटील): मदत व पुनर्वसन.

नितेश राणे : मत्स्यव्यवसाय व बंदरे.

आकाश फुंडकर : कामगार.

बाबासाहेब पाटील : सहकार.

प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.

राज्यमंत्री

अॅड. आशिष जयस्वाल : वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार,

माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.

डॉ पंकज भोयर : गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म.

मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम).

इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद आणि जलसंधारण.

योगेश कदम : गृह ( शहरी) महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

धर्म प्रचारासमवेत शिक्षण व आरोग्य क्षेत्रात समाधा आश्रमाचे अमूल्य योगदान

Sun Dec 22 , 2024
नागपूर :- समाधा आश्रमाने सिंधी बांधवांना धर्माचे नैतिक अधिष्ठान दिले आहे. यासोबतच शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. आरोग्यासारख्या जनसेवेचा अनेक गोरगरिबांना लाभ होत आहे. भारताच्या फाळणीनंतर सिंधी समाजाने अनेक महानगरात येऊन आपल्या कर्तृत्त्वाच्या माध्यमातून भारताच्या समृध्दीसाठी दिलेले योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. नागपूर येथील पूज्य समाधा आश्रमाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!