महाराष्ट्र गुंडगिरीचा अड्डा बनला आहे संजय राऊताचे टिकास्त्र

नवी दिल्ली :- महाराष्ट्रासारखं मोठं राज्य हे या देशातील गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री गुंडाना पोसत आहेत. मुख्यमंत्र्यांना ‘वर्षा’वर गुंडाच्या टोळ्या येऊन भेटतात. वर्षावर, मंत्रालयात गुंडाच्या टोळ्यांच्या म्होरक्यांसोबत बैठका होतात, असे सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मुंबईचा माजी पोलिस अधिकारी हे सर्व घडवतोय, असा गंभीर आरोप त्यांनी केला. लोकसभा, विधानसभा निवडणूक आणि महापालिकेत देखील विरोधकांना संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे, असा दावाही राऊत यांनी केला.

आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर गुंड आणि राजकीय नेत्यांच्या संबंधावर चर्चा होऊ लागली. त्यातच खासदार श्रीकांत शिंदे यांना पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर याने श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर अजित पवार यांची पिंपरी चिंचवडमधील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने भेट घेतली. यावर संजय राऊत यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज माध्यमांशी बोलताना राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्र सरकारच्या त्या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत, भाव झाले निम्मे

Tue Feb 6 , 2024
नाशिक :- शेतकऱ्यांसाठी शेती करणे अवघड होऊ लागली आहे. कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस यामधून सुटल्यानंतर चांगले उत्पादन आल्यास शेतमालास दर मिळत नाही. कधी शेतमालास दर मिळाल्यास सरकारकडून निर्यातबंदीची घोषणा केली जाते. यामुळे शेतमालाचे दर बाजारात कोसळतात. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यात बंदी करण्याचे आदेश ८ डिसेंबर रोजी काढले होते. त्यानंतर कांद्याचे दर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com