राज्य मंत्रिमंडळ बैठक:संक्षिप्त निर्णय – दिनांक १३ मार्च २०२४

– मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर ( मराठी भाषा विभाग)

– पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार ( गृह विभाग)

– अहमदनगर शहराचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्यास मान्यता ( सामान्य प्रशासन विभाग)

– केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता( नगरविकास विभाग)

– श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार( सार्वजनिक बांधकाम विभाग)

– कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प( मदत व पुनर्वसन)

– भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज( वित्त विभाग)

– राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ( आरोग्य विभाग)

– महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार . नफ्यात आणणार( दुग्धविकास विभाग)

– मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार( जलसंपदा विभाग)

– मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार( जलसंधारण विभाग)

– शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता २५ हजार रुपये अनुदान संस्थाना. ( महिला व बालविकास)

– मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले. (वैद्यकीय शिक्षण)

– आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार. ( कौशल्य विकास)

– कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.( ऊर्जा विभाग)

– शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता( ऊर्जा विभाग)

– पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार (पशुसंवर्धन व दुग्धविकास)

– पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता( महसूल विभाग)

– म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन( वैद्यकीय शिक्षण विभाग)

– आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ ( सार्वजनिक आरोग्य विभाग)

– मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार( परिवहन विभाग)

– मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता( नगरविकास विभाग)

– मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते( ग्रामविकास विभाग)

भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार

– महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन( महसूल व वन विभाग)

– जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता( परिवहन विभाग)

– दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना( पशुसंवर्धन व दुग्धविकास)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोर्टाच्या आदेशाने ईगल कंपनीच्या जी एम सह पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल 

Wed Mar 13 , 2024
कन्हान :- ओसीएम व इंदर एकीकृत कोळसा खाणीत शुरू असलेल्या कन्त्राट पद्धतीने शुरू असलेल्या ईगल कंपनीच्या जी.एम सह पांच जणांवर विनयभंगाचा गुन्हा मा. न्यायालयाच्या आदेशाने कन्हान पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे . आरोपी मध्ये अमरेश मिश्रा ( जी एम इगल कंपनी ), शुभम शुक्ला, राहुल शुक्ला, सुनील कुशवाह , सुमित उर्फ बल्लन गोस्वामी सर्व रा. खदान क्र 6 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com