कोर्टाच्या आदेशाने ईगल कंपनीच्या जी एम सह पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल 

कन्हान :- ओसीएम व इंदर एकीकृत कोळसा खाणीत शुरू असलेल्या कन्त्राट पद्धतीने शुरू असलेल्या ईगल कंपनीच्या जी.एम सह पांच जणांवर विनयभंगाचा गुन्हा मा. न्यायालयाच्या आदेशाने कन्हान पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे . आरोपी मध्ये अमरेश मिश्रा ( जी एम इगल कंपनी ), शुभम शुक्ला, राहुल शुक्ला, सुनील कुशवाह , सुमित उर्फ बल्लन गोस्वामी सर्व रा. खदान क्र 6 व परशुराम गौतम रा. कांद्री कन्हान यांचा समावेश आहे

ओसीएम व इंदर एकीकृत कोळसा खाणीत शुरू असलेल्या कन्त्राट पद्धतीने शुरू असलेल्या ईगल कंपनी मध्ये मेस ( खानावळ ) चे काम मिळवण्याकरिता विजयालक्ष्मी महिला बचत गटाने रितसर अर्ज करून भेट घेण्याकरिता गेले असता  नमूद गैरअर्जदारानी मैनेजमेंटला भेटु दिले नाही. आम्ही स्थानिक असून आम्हाला भेटु द्या असा आग्रह करता मारहाण शुरू केली. सोबत अश्लील शिव्या देत अश्लील वागणूक दिली व विनयभंग असून जीवे मारण्याची धमकी दिली होती . याबाबदची तक्रार आम्ही कन्हान पोलीस स्टेशन येथे केली असता न्याय मिळाला नाही . वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा दखल घेतली नाही तरी मा. न्यायालयात दाद मागतली असता प्रथम श्रेणी दीवानी व फौजदारी न्यायालय कामठी यांनी नमूद गैरअर्जदारा विरुद्ध फिर्यादि इंद्रावती शिवपूजन कुर्मी ( वय 45 ) रा. खदान क्र 6 याच्या दादीवरुन मा. न्यायालयाने आरोपी विरुद्ध कलम 354 , 294, 506, 143 अन्वये गुन्हा नोंद करण्याच्या आदेशानव्ये कन्हान पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास कन्हान पोलीस करीत आहेत.

अपराधिकवृत्तिच्या लोकांना कामावर ठेवून गुंडागर्दी – ईगल कंपनी मध्ये कामावर कार्यरत कर्मचारी आपराधिक पार्श्वभूमि असणारे आहेत . पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेतल्यावर सुद्धा त्यांना हाताशी बाळगुन गुंडागर्दी करण्याच्या काम कंपनी करत आहे . सामान्य लोकांना धाक दाखवून न्याय मागता येवू नये ह्या हेतुने कंपनी काम करत असल्या आरोप अर्जदार इंद्रावती कुर्मी यांनी केला आहे . नमूद गैरअर्जदारा पैकी एका विरुद्ध एम पी डी ए अन्वये कारवाई सुद्धा झाली आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील १०० महाविद्यालयात सुरु होणार अद्ययावत कौशल्य विकास केंद्र

Wed Mar 13 , 2024
मुंबई :- २०२४-२५ सालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. यानुसार दिनांक १३ मार्च २०२४ रोजी राज्यातील १०० महाविद्यालयांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights