मुद्रांक विक्रेत्यांच्या मुद्रांक विक्रीबंद एक दिवसीय धरणा आंदोलनाला कामठी मुद्रांक विक्रेत्यांचा पाठींबा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मुद्रांक विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांच्या वतीने आज 30 ऑक्टोबर ला नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय धरणा आंदोलन पुकारण्यात आले .या धरणा आंदोलनात कामठी मुद्रांक विक्रेता संघटनेनेही पाठींबा देत सहभाग नोंदविला. यासंदर्भात कामठी मुद्रांक विक्रेता संघाच्या वतिने मुद्रांक विक्रेता राजेश कांनफाडे यांच्या नेतृत्वात कामठी तहसिलदार अक्षय पोयाम यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.

या निवेदनात उल्लेखित आहे की 100 रुपये आणि 500 रूपयाच्या मुद्रांकाची छपाई बंद होणार आहे.पक्षकारांना राष्ट्रीयकृत बँकेतुन फ्रेकिंगद्वारे मुद्रांक पुरवठा होणार आहे.बँकेद्वारा मुद्रांक विक्री झाल्यास पक्षकारांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होईल तसेच फ्रेकिंगमुळे आर्थिक व्यवहारातील विश्वासहर्ता राहणार नाही .100 रुपये आणि 500 रुवयांचे मुद्रांक बंद करू नये यासाठी आयोजित एक दिवसीय धरणा आंदोलनाला पाठींबा देत धरणा आंदोलनात कामठी मुद्रांक विक्रेता संघाने सहभाग नोंदविला .व आज एक दिवस मुद्रांक विक्री बंद ठेवण्यात आले.यासंदर्भात कामठी तहसिलदार यांना कामठी मुद्रांक विक्रेता संघाच्या वतीने सामूहिक निवेदन देण्यात आले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील कांग्रेसचे निरीक्षक हुकुमचंद आमधरे यांची निवडीबाबत सत्कार

Mon Oct 30 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सहकार क्षेत्रातील तज्ञ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई व कामठीचे संचालक हुकूमचंद आमधरे यांची तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीकरिता कांग्रेस तर्फे निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.त्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती कामठी कार्यालय मध्ये सभापती अनिकेत शहाणे ,उपसभापती कुणाल इटकेलवार यांच्या हस्ते हुकूमचंद आमधरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी समितीचे संचालक सुधीर शहाणे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com