छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

– बक्षीस वितरण समारंभात स्पर्धकांच्या चित्रांच्या प्रदर्शनीचे आयोजन !

– 12 फूट * 15 फूट चे राजमाता जिजाऊ आणि शिवबांचे चित्र ठरले आकर्षणाचे केंद्र

नागपूर :- माँसाहेब जिजाऊ मातृशक्ति जागृति प्रतिष्ठान, नागपुर द्वारे आयोजित नागपूर स्तरावरील आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत 42 शाळांच्या 1860 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून खुल्या वयोगटात जुटच्या कापडावर चित्रकला स्पर्धेत 93 स्पर्धकांनी “जिजाऊ चे शिवबा” आणि “मेरे राम” या विषयावर सुंदर चित्र रेखाटले.

रविवार 25 फेब्रुवारी रोजी या दोन्ही स्पर्धांचे बक्षीस वितरण कांचन गडकरी आणि दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या हस्ते संपन्न झाले.

वर्ष २०२४ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष असून या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांपासून तर खुल्या वयोगटातील सर्व सामान्य नागरिकांनी या उत्सवात सहभागी व्हावे या उद्देशाने माँसाहेब जिजाऊ मातृशक्ति जागृति प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने दोन स्तरांवर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

कागदावरील चित्रकला स्पर्धा 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान शाळा शाळांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत 42 शाळांच्या 1860 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेच्या शाळास्तरावरील विजेत्यांना पदक आणि नागपूर स्तरावरील विजेत्यांना रोख बक्षीस आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले. नागपूर स्तरावरील 2 विजेत्या शाळांना आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.

खुल्या वयोगटात जुटच्या कापडावर चित्रकला स्पर्धा दि. 14 फेब्रुवारीला, महिला महाविद्यालय नंदनवनला संपन्न झाली होती. या स्पर्धेत 93 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून स्पर्धकांनी अतिशय उत्कृष्ट असे चित्र साकारले.

चित्रकला स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन बक्षीस वितरण समारंभाच्या ठिकाणी सर्व नागरिकांसाठी प्रदर्शीत केली होती. या प्रदर्शनीत मैत्री परिवार संस्थेच्या उन्नतिगृह छात्रावासात राहणाऱ्या मुकबधिर विद्यार्थी दिपक पाटील याने साकारलेल्या 12*15 फुटाच्या राजमाता जिजाऊ आणि शिवबांच्या चित्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून मान्यवरांच्या हस्ते दीपक पाटील आणि छात्रावासाचे व्यवस्थापक बंडू भगत यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कांचन गडकरी यांनी सर्व स्पर्धकांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. घरा घरात राजमाता जिजाऊ सारखे संस्कार करणाऱ्या मातृशक्तीची आता समाजाला खरी गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

मना मनात शिवराय आणि घरा घरात शिवजयंती साजरी व्हावी या उद्देशाने माँसाहेब जिजाऊ मातृशक्ति जागृति प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या उपक्रमासाठी मी आयोजकांचे अभिनंदन करतो आणि पुढील वर्षी यापेक्षाही अधिक भव्य आयोजन संस्थेने करावे असे आवाहन आमदार मोहन मते यांनी केले.

या चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून वंदना खेडेकर आणि  जया गुप्ता यांनी परीक्षण केले असून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन विशाखा मंगदे यांनी केले. आयोजन समितीचे सदस्य आणि स्पर्धेचे समन्वयक धनंजय पाठक यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवी फडणवीस यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. महिला महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका भागडीकर, राजेश पलांदुरकर, संजय येलुरे इत्यादी मान्यवर मंचावर विराजमान होते.

या आयोजनात राजेश पलांदुरकर, हर्षवर्धन दिक्षित, धनंजय पाठक, रोहित हिमते, अमोल तिडके, पियूष बोईनवार, सिद्धांत चांदेकर, महेश महाडिक, बंडू भगत, चेतन हिंगनिकर, अक्षय तिडके, जयंत चौहान, स्वप्नील कुंदेलवर, श्रीधर हतागळे, संजय मार्कंडे, पवन मुरारकर, सौजन्य मिश्रा यांचा सहयोग लाभला. ई-स्त्री ज्यूट स्टोअर, श्री राधे वृंदावन फॉर्म अँड रिसॉर्ट, अर्टिस्टिक प्रिंटस आणि गोली वडापाव मानेवाडा स्टोअर हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

थिंकिंक पिक्चर्स लिमिटेड की बोनस इश्यू और स्टॉक स्प्लिट के लिए मीटिंग 

Wed Feb 28 , 2024
– कंपनी ने यूएई में वीएफएक्स और ओटीटी प्लेटफॉर्म कंपनी के लॉन्च के साथ किया अंतर्राष्ट्रीय स्तर पर विस्तार ● 1 मार्च,2024 को होने वाली बोर्ड मीटिंग में कंपनी प्रति शेयर 3 रुपए तक का लाभांश देने पर भी विचार करेगी। ● मौजूदा शेयरधारकों को फायदा देने के अलावा, बोनस और स्टॉक विभाजन से कंपनी के शेयर में लिक्विडिटी बढ़ेगी। ● […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com