संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रा. पं. भामेवाडा मौजा आसलवाडा येथील सिंचन तलावाच्या मालकी दस्तावेजावर शासकीय विभागाची नोंद करण्याबाबत विशेष ग्राम सभेचे आयोजन केले होते. या मध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या तलावामध्ये आधीपासून आजूबाजूच्या गावातील सिंचन, गुरे ढोरे पाणी पिणे, कपडे धुवायचे काम, आणि मागील ७० वर्षापासून जिल्हा परिषद मार्फत या तलावाचा लिलाव हा मच्छीमार सोसायटीला करण्यात येतो. व मच्छीमारीचा व्यवसाय केला जातो. आणि आज कुठेतरी कोणी एक व्यक्ती ज्यांच सातबाऱ्यावर नाव आहे याचा गैरफायदा घेऊन हा तलाव हडपन्याच्या प्रयत्न करीत आहे म्हणून त्याच्या विरोधात आज या विशेष ग्रामसभेच आयोजन केले होते.
या विशेष ग्रामसभेमध्ये आसलवाडा येथील तलावाच्या दस्तावेजावर जिल्हा परिषद नागपूर चं नाव चढण्यात यावं असा ठराव मांडण्यात आला होता त्याला नागपूर जिल्हा परिषद चे महिला व बाल कल्याण सभापती प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे यांनी अनुबोधन दिले व एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. येणाऱ्या दोन आठवड्यामध्ये दस्तावेजाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास आम्ही सर्व आंदोलन करू अश्या प्रकारचा इशारा आजच्या या विशेष सभेमध्ये उपस्थित सर्व गावकरी नागरिकांकडून देण्यात आला.
प्रसंगी विशेष ग्रामसभेच्या अध्यक्ष भामेवाडा ग्रा प सरपंच सविता फुकट प्रामुख्याने उपस्थित होते तसेच प्रा.अवंतिका रमेश लेकुरवाळे,कामठी पंचायत समिती उपसभापती दिलीप वंजारी,माजी उपसभापती आशिष मल्लेवार, उपसरपंच रतन उके, पाठबंधारे विभागाचे श्याम , ग्रा.पं. सदस्य अर्जुन राऊत, ग्रा.पं. सदस्य कविता गायधने, दिनकर येंडे, सुरेश बागडे, सुखदेव साखरकर, सुधाकर ठवकर, गुड्डू खराबे, अंकुश येंडे, दिगंबर साखरकर, हरीचंद येंडे, पुरुषोत्तम बावनकर, नामो राऊत, प्रल्हाद खेडकर, प्रमोद गायधने, दिलीप वाघाडे, अभिमन उके, तलाठी वड्डे सर, ग्रा.पं.सचिव वांढरे आणि बहु संख्येने गावकरी नागरिक उपस्थित होते.