संशयास्पद हालचाली होत असलेल्या बंद कारखान्यांची तपासणी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :- राज्यातील काही भागात बंद असलेल्या कंपन्यांमध्ये ड्रग्ज तयार करण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे संशयास्पद हालचाली होत असलेल्या बंद कारखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य अनिकेत तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांनी पकडला याविषयी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ड्रग्जविषयी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. इतर राज्यातील यंत्रणेसोबत राज्यातील पोलीस समन्वयाने कार्यवाही करीत आहेत. राज्यात ड्रग्ज विरोधात कडक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. सदस्यांनी केलेल्या सूचनांचाही सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जल जीवन मिशनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावी - उपमुख्यमंत्री अजित पवार

Fri Dec 8 , 2023
नागपूर :- केंद्र सरकारच्या ‘हर घर नल से जल’ या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरात नळाने पिण्याचे पाणी पुरविण्याचा संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत सुरू असलेली कामे युध्दपातळीवर पूर्ण करावीत. यासंदर्भातील सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्तावातील त्रुटी दूर करून सादर कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.         […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!