संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यात पावसाचा अनियमितपणा असल्यामुळे कामठी तालुक्यात पावसाच्या असमतोलपनामुळे काही ठिकाणी काही भागात तुरळक पाऊस पडल्याने तसेच काही ठिकाणी मुबलक प्रमानात पाणी नसल्याने व पाण्याचा निचरा न झाल्याने बहुतांश भागातील पेरण्या खोलंबल्या आहेत.तर बहुतांश भागात पिकाचे आयुष्य तुरळक पावसावर अवलंबून आहे. पिकाच्या ऐन फुलोऱ्याच्या हंगामात कमी जास्त पावसामुळे मालाच्या उताऱ्यावर परिणाम होण्याचा अंदाज आहे.
मृग नक्षत्र कोरडा गेल्यानंतर पावसाने अनियमितता सुरू केली.काही दिवस पाऊस पडला मात्र त्या परिसरातील बंधाजवळील पाण्याचा निचरा न झाल्याने पेरण्या झाल्या नाहीत तर काही ठिकानी झालेल्या तुरळक पावसामुळे पिके तग धरून आहेत.तर काही ठिकाणी पावसा अभावी पिकाखालील जमिनीला भेगा पडत आहेत.