नागपूर :- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व आठवीच्या च्या विद्यार्थ्यांनी नव्याने प्रवेश घेण्याकरीता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज दिनांक 8 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर २०२२ पर्यंत सादर करावे.
विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये १० ते २३ नोव्हेंबर २०२२ पर्यत सादर करावे. संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जमा करावी. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी या http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन नागपूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.