नागपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण पश्चिम विभागातील विभाग अध्यक्ष या पदावर नागपूरचे तुषार गिऱ्हे यांची पून्हा नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांनी नियुक्तीपत्र दिले तसेच संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहर चे दोन्ही नवनियुक्त शहराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. शहराध्यक्ष चंदू लाडे व विशाल बडगे यांनी पुढील वाटचालीस नवनियुक्त विभाग अध्यक्ष दक्षिण पश्चिम तुषार गिऱ्हे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे चेतन बोरकुटे यांनी कळविले.