संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सिंधुताई सपकाळ महिला महाविद्यालय बडेगाव व राम लक्ष्मी प्रतिष्ठान पिंपळा डागबंगला यांचे संयुक्त विद्यमाने शिक्षण क्षेत्रात दिल्या जाणारा राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार कामठी येथील समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. मनीष प्रभाकर मुळे यांना नुकताच पिपळा डागबंगला येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. राम लक्ष्मी सभागृहात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तावडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुप कुमरे, प्रफुल्ल शिंदे, डॉ चंदू पाटील ,सुभाष ठेंगरे, राजेंद्र काळे उपस्थित होते. सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राा. डॉ. मनीष प्रभाकर मुळे यांना पाहुण्यांच्या हस्ते राज्यस्तरीय शैक्षणिक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्याबद्दल समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रुबीना अन्सारी ,प्राध्यापक डॉ मनोज होले, डॉ ओमप्रकाश कश्यप, डॉ राष्ट्रपाल मेश्राम आदींनी अभिनंदन केले , कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराव तावडे म्हणाले ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासात शिक्षक, प्राध्यापक , पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे फार मोठे मोलाचे योगदान आहेत त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे होऊन गाव आदर्श होत असल्याचे मत व्यक्त केले आहे त्याकरिता शिक्षक पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामीण विकासाकरता सहकार्य करण्याचे आवाहन केले.