नागपूर :-पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत नमन किराणा स्टोअर्स, चाटकर गल्ली, लालगंज येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले तंबाखुजन्य पदार्थ विक्री करीता साठा करून ठेवल्याचे खात्रीशीर माहिती वरून गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचुन धाड टाकली असता नमुद ठिकाणी आरोपी नमन अजय केसवानी वय २० वर्ष, रा. लालगंज राउत चौक, रामनगर, पाचपावली, नागपूर यांचे ताब्यातुन विवीध प्रकारचे सुगंधीत प्रतिबंधीत तंबाखू तसेच सुगंधीत पान मसाले बाबा, ब्लॅक सागर, शक्ती, रत्ना, बागवन, राजश्री गुटखा, रजनीगंधा, पानपराग, पानबाहार असा एकूण ४५,६३५/- चा मुद्देमाल मिळुन आला. मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे पाचपावली येथे कलम १८८ २७२, २७३. ३२८, भा.दं.वी., सहकलम ५९ अन्न व सुरक्षा मानके अधिनीयम अन्वये गुन्हा नोंदवुन आरोपी व मुद्देमाल पुढौल योग्य कारवाईस्तव पाचपावली पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) मुम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी, सचिन बोंडे व पथकातील अंमलदार यांनी केली.