नागपूर :- श्रीकृष्ण जयंती (जन्माष्टमी) दिनानिमित्त बुधवार ६ सप्टेंबर २०२३ रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहे. या संदर्भातील आदेश मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे.
उपायुक्त यांच्या आदेशानुसार, श्रीकृष्ण जयंती (जन्माष्टमी) दिनानिमित्त बुधवार ६ सप्टेंबर २०२३ रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक ०२/०९/२०१८ रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुर ठराव क्रं.240 दिनांक ०२ /०७/२०१८ अन्वये मा.आयुक्त यांचे दिनांक ०३ /०८/२०१८ चे मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतला आहे. त्यानुसार बुधवार ६ सप्टेंबर २०२३ ला “श्रीकृष्ण जयंती” (जन्माष्टमी) दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिकेच्या भरारी पथकाद्वारे कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.