महात्मा गांधी जयंती निमित्त कत्तलखाने व मांस विक्री बंद

नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त २ ऑक्टोबर रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी आदेश निर्गमित केले आहेत.

उपायुक्तांच्या आदेशानुसार, महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासन जीइएन – १०८७/१२८६/सीआर-९३/८७/नवि/१०, दिनांक २२ एप्रिल १९८७ नुसार सोमवार दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ ला नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिके व्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्रीगणेशाच्या १ लाख ४४ हजार मूर्तींचे विसर्जन

Fri Sep 29 , 2023
– कोरोडी येथे २७० मोठ्या मूर्तींचे विसर्जन नागपूर :- संपूर्ण नागपूर शहरामध्ये भक्तीभावाने गणरायाचे विसर्जन करण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील दहाही झोनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व विसर्जन कुंडांवर एकूण १४४१६९ मूर्तींचे विसर्जन करण्यात आलेले आहे. याशिवाय ४ फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था कोराडी येथे करण्यात आलेली असून येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com