आनंद नगरात स्पिड ब्रेकर लावा, नागरी सुविधा समिति चे मुख्याधिकाऱ्याना निवेदन

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधितुन आनंद नगर रामगढ भागात प्रशस्त सिमेंट रोड बांधण्यात आले असून सुसाट धावणाऱ्या वाहनांना आळा घालण्या साठी पाच ठिकाणी गतिरोधक लावण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन नागरी सुविधा समिति चे अध्यक्ष उज्वल रायबोले यांनी आज दुपारी मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना सोपविले.

आनंद नगर येथे तीन आरा मशीन आणि कोठारी गैस गोडाउन असल्यामुळे दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते, नविन सिमेंट रोड झाल्याने वाहने वेगात चालविली जातात त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे करिता निशा मेश्राम यांच्या घराजवळ, श्री हनुमान मंदिर समोर, अंकित बंसोड यांच्या घराजवळ, सविता टेकाम यांच्या घरा जवळ आणि शंकर कुर्वे यांच्या घरा जवळ गतिरोधक उभारण्याची मागणी करण्यात आली मुख्याधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनावर विक्की बोंबले, रोशनलाल दमाहे, रमेश यादव, सेवाराम टंडन,अनमोल तिरपुड़े, योगेश देवांगन, सुनिल हजारे, निमिष सांगोड़े, बादल नारायने, अजित सोनकुसरे, अनिकेत चाटे,खोमिन शाहू, द्वारका दमाहे, नंदा आमधरे, सरिता मेश्राम,खोमेश्वरी शाहू, शिवानी चौबे आणि माजी नगरसेविका संध्या रायबोले यांच्या स्वाक्षरी आहेत.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com