गोवर्धन पूजेनिमित्त रेड्याची मिरवणूक उत्साहात..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 14 :- भारत हा कृषिप्रधान आणि संस्कृती प्रधान देश आहे. या देशात प्रत्येक सन मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जातो. होळी , पोळा , दिवाळी सारख्या सणांना या देशात एक महत्वाचे स्थान आहे यानुसार दिवाळी सनाचा दुसरा दिवस म्हणजे पाडवा .यानुसार दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पाडव्यानिमित्त गोवर्धन पूजा केली जाते या दिवशी रेड्याची मिरवणूक काढन्यात येते याला एक दंतकथेचा आधार आहे या पूजेसाठी ब्रजवासीयांनी जेव्हा 56 भोग तयार केले होते तेव्हा परमेश्वराने गोवर्धन पर्वतात प्रवेश करून त्या 56 पदार्थाचा भोग केला आणि ब्रजवासीयांना सुख, शांती आणि समृद्धीचा शुभाशीर्वाद दिला या दिवशी भक्तगण तसेच गोपालन निसर्गाच्या सुरक्षेची शपथ घेतात , गोपालन तसेच गोरक्षेचे प्रण करून निसर्गाची रक्षा करण्याचा निर्धार करतात या कथेद्वारे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिवाळीच्या दुसऱ्या दीवशी गोवर्धन पूजेच्या माध्यमातुन येथील यादवी समाजबांधवांनी आपापल्या घरच्या रेड्याला सजवून गवळीपूरा कामठी येथील भगवान श्रीकृष्ण मंदिरात दर्शन घेऊन ढोल, ताशे,डीजे फटाक्याच्या आतिषबाजेत सजवलेल्या रेड्याची शोभायात्रा काढून शहरातील जयस्तंभ चौक,मोटर स्टँड चौक,मेन रोड ,नगर परिषद मार्गे मुख्य रस्त्याने भ्रमण करीत ढोल ताश्याच्या गजरात नाचत गाजत मिरवणूक तहसील कार्यालया मागील भैसाशूर मंदिरात सजविलेल्या रेड्याला नेऊन दर्शन घेऊन पूजा आराधना करून दर्शन घेऊन परतुन गवळीपूरा येथील श्रीकृष्ण मंदिरात रेड्याच्या मिरवणुकीचे समापन केले .तर घरासमोर गोधनाची स्थापना करून गृहिणींनी त्याची पूजा केली .

मिरवणुकीत यादव समाजाचे प्रमुख प्रभूदयाल यादव, उदयसिंग यादव, अनंतलाल यादव,, , इंदलसिंग यादव,बनवारी यादव, शीतल पटेल, धीरज यादव, रामनाथ यादव, रामभरोसे यादव,सदन यादव, भैय्याजी यादव, शिव यादव, नितेश यादव,रितेश यादव, बिल्लू यादव,गोल्डी यादव, कल्लू यादव, राजा यादव, , ,, जयपाल यादव, ऍड पंकज यादव,हरीसिंग यादव,लालसिंग यादव,ज्ञानसिंग यादव ,विनोद पटेल, मुकेश यादव,संतोष यादव,लक्खू यादव,मनोज यादव,कृष्णा पटेल, सुशील यादव, , पप्पू यादव, बाबा यादव ,, , विक्की यादव, आदींचा सहभाग होता.

Next Post

कामठी कांग्रेस कार्यालयात पंडित जवाहरलाल जयंती साजरी

Tue Nov 14 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा दरवर्षी संपूर्ण देशात बालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे मौलिक प्रतिपादन कामठी नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत यांनी आज 14 नोव्हेंबर ला कामठी येथिल नगर कांग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित पंडित जवाहरलाल जयंती दिन निमित्त कार्यक्रमात व्यक्त केले. याप्रसंगी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com