पोलीस महासंचालक पदाचा तात्पूरता कारभार विवेक फणसाळकरांकडे; नितीन करीर मुख्य सचिवपदी

मुंबई :- पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं ते निवृत्त झाले आहेत. त्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा तात्पूरता कारभार विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार रश्मी शुक्ला यांचे नाव प्रथम क्रमांकावर होते. पण, त्या या पदासाठी इच्छूक नव्हत्या. त्या मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी प्रयत्न करत आहेत.

नितीन करीर यांना मुख्य सचिवपद देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागात काम केल्याचा त्यांना अनुभव आहे. नितीन करीर हे १९८८ च्या आयएएस बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. दुसरीकडे, विवेक फणसाळकर हे पोलीस महासंचालक पदासाठी इच्छूक होते. पुढील नियुक्ती होईलपर्यंत त्यांना पोलीस महासंचालक पदाचा पदभार सांभाळावा लागणार आहे.

Advertisement

रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदाचा पदभार देण्यात येईल अशी दाट शक्यता होती. तशाप्रकारची चर्चा सुरु झाली होती. शिवाय त्या ज्येष्ठता यादीमध्ये सर्वात वरती होत्या. तसेच त्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या असल्याने त्यांना पोलीस महासंचालक करण्यात येईल असं जवळपास निश्चित होतं. पण, तुर्तास त्यांना पदापासूर दूर ठेवण्यात आलं आहे.

दुसरीकडे, नितीन करीर हे १९८८ च्या बॅचचे IAS असलेले महाराष्ट्राचे मुख्य सचिव झाले आहेत. सध्या ते वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. आज संध्याकाळी सीएस मनोज सौनिक यांच्याकडून नितीन करीर यांनी पदभार स्वीकारला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाईकच्या टँकमध्ये पेट्रोल ऐवजी दारू! चंद्रपुरमधील पोरांचा जुगाड पाहून पोलिसही चक्रावले

Mon Jan 1 , 2024
चंद्रपुर :-बाईकच्या टँकमध्ये पेट्रोल ऐवजी दारू भरण्यात आली आहे. चंद्रपुरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बाईकद्वारे दारू तस्करी करण्यात येत होती. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी पोलिसांनी पकडली ही बाईक पकडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. सध्या या अजब दारु तस्करीची चंद्रपुरमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.   Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com