डुमरीकला शिवारात ७,१६,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी ला पारशिवनी पोलीसानी केली अटक.

पारशिवनी:- तालुकातिल डुमरीकला ह्दीतील डुमरीकला शिवारात निकोला बार & रेस्टॉरेंट चे समोर NH – 44 चे जवळ मंगलवार चे दिनांक २७ / डिसेबर / २०२२ रोजी टाटा योध्दा कंपनीच्या मालवाहु वाहन क्र . MH – 44 / U – 0805 चे चालक नामे भगवान वातुजी कावळे वय ४३ वर्ष रा . अंबाळा वार्ड , रामटेक हा रामटेक येथिल किराणा दुकानदार कशिश परितोष चौकसे वय २७ वर्ष रा . सुभाष वार्ड , रामटेक यांचेकरीता इतवारी , नागपुर येथुन किराणा माल आणण्याकरीता मालवाहु वाहन क्र . MH – 44 / U – 0805 ने रामटेक वरून नागपुरला जात असतांना सकाळी १०:३० वा . दरम्याण डुमरीकला शिवारात निकोला बार & रेस्टॉरेंट चे समोर NH – 44 चे वर दोन मो.सा. वरील तिन अनोळखी इसमांनी डोळ्यात पावडर / भुकटी टाकुन वाहणातील नगदी ४ लाख रूपये चोरून नेले आहे ,

अशा प्राप्त माहीतीवरून घटनेची शहानिशा करने करीता पोलीस स्टेशन पारशिवनी येथिल PSI दिलीप बासोडे , पोहवा . / गंगाप्रसाद वरखडे व पोहवा / संदीप कडु यांना घटनास्थळी रवाना करून तक्रारदार कशिश परितोष चौकसे वय २७ वर्ष सुभाष वार्ड , रामटेक यांचे तोंडी तक्रारी वरून पो.स्टे . पारशिवनी ला अप.क्र . ३७८/२२ कलम ३ ९ २ , ३४ , ५०६ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . तपासा दरम्याण पो.स्टे . पारशिवनीतील तपास पथकाचे PSI दिलीप बासोडे , पोहवा . / गंगाप्रसाद वरखडे व पोहवा / संदीप कडु यांनी घटनास्थळी भेट देवुन घटनेबाबत शहानिशा केली असता वाहण क्र . MH – 44 / U – 0805 हे घटनास्थळी रोडखाली सुस्थितीत उभे केलेले दिसुन आले , वाहणाचे बाहेरील भागाचे दार , समोरील काच तसेच आतील भागाचे स्टिअरींग , सिट , डॅशबोर्डवर कुठेही पावडर / भुकटीचे अंश मिळुन आले नाही तसेच वाहणात कुठेही जबरदस्ती शिरकाव केल्याच्या खुना आढळुन आल्या नाही यावरून यातील वाहन क्र . MH – 44 / U – 0805 चे चालका भगवान वातुजी कावळे ने सांगीतलेली घटना ही संशयास्पद वाटत असल्याने वाहण क्र . MH – 44 / U – 0805 चे चालक भगवान वातुजी कावळे व त्याचा मित्र निलेश सदानंद गिरी वय ३० वर्ष रा . मनसर यांना ताब्यात घेवून त्यांना घटनेबाबत सखोल विचारपुस केली असता त्यांनी अनोळखी आरोपीतांकडुन त्यास जबरीने लुटल्याची घटना खोटी असल्याचे व त्यांनी स्वतःच स्वत : चे आर्थिक फायद्या करीता पैशांचे लोभापाई फिर्यादीने त्याचेकडे विश्वासाने सोपविलेले ४,००,००० रू .( चार लाख रुपये) काढुन लपवुन ठेवले असल्याचे सांगीतले . सदर गुन्हयाचे तपासात पो.नि. राहुल सोनवणे यांचे मार्गदर्शनात PSI दिलीप बासोडे , पोहवा . / गंगाप्रसाद वरखडे व पोहवा / संदीप कडु यांनी अतिशय वेगाने तपासचक्र फिरवुन पो.स्टे . ला गुन्हा दाखल झाल्याचे अवघ्या दोन तासात सदरचा गुन्हा उघडकीस आणुन दोन आरोपीतांना अटक करून दोन्ही आरोपीतांचा मा . JMFC पारशिवनी येथुन दोन दिवसांचा PCR प्राप्त केला , आरोपीतांकडुन रोख रक्कम ४,००,००० रूपये , एक टाटा योध्दा वाहन क्र . MH – 44 / U 0805 किंमती ३,००,००० रू . दोन मोबाईल फोन किं . १६००० रू . असा एकुण ७,१६,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . सदर गुन्हयात भादविचे कलम ४०६ , ३४ , १२० ( ब ) अन्वये कलमवाढ करण्यात आलेली असुन पुढील तपास PSI दिलीप बासोडे हे करीत आहेत . सदरची कार्यवाही मा . विशाल आनंद ( भा.पो.से. ) पोलीस अधिक्षक ना.ग्रा . , मा . डॉ . संदीप पखाले अपर पोलीस अधिक्षक ना.ग्रा . तसेच मा . अशित कांबळे ( भा.पो.से. ) सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी , रामटेक यांचे मागदर्शनात पो.नि. राहुल सोनवणे यांचे नेतृत्वात PSI दिलीप बासोडे , पोहवा . संदीप कडु , पोहवा . / गंगाप्रसाद वरखडे , सफौ . / प्रमोद कोठे , पो.अं. / महेश फुलझेले तसेच महीला कर्मचारी कविता लोखंडे यांनी केलेला आहे .

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामटेक परीसरात चोरट्यांचा हैदोस

Fri Dec 30 , 2022
रामटेक परीसरात उरला नाही ‘ खाकीचा धाक ‘ रामटेक परीसरात खाकीचा धाक ओसरला – नागरीकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर – नगदी रोकड, दागीने, दुचाकींसह सायकलींवर चोरट्यांचा हात साफ – चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ रामटेक :-रामटेक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे. कुठे घरफोडी करून नकद, दागीन्यांवर हात साफ करणे, दुकानांसमोरून दुचाकी चोरून नेणे तर दिवसाढवळ्या घरासमोरुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com