नागपूर :- महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून नागपूर शहरात जी-20 अंतर्गत आयोजित सी-20 परिषदेत महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. शिखर परिषदेला उपस्थित भारतासह 26 देशांच्या एकूण 357 प्रतिनिधींपैकी तब्बल 164 महिला होत्या. जगाच्या प्रगतीत पुरूषांच्या जोडीला महिलांचाही सहभाग अत्यावश्यक असल्याचे सी-20 परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी माता अमृतानंदमयी प्रतिपादित केले होते. या वक्तव्याचा परिचय नागपुरातील सी-20 परिषदेत महिला प्रतिनिधींच्या उल्लेखणीय उपस्थितीतून दिसून आला. सी-20 शिखर परिषद ही नागरी समाज संघटनांसाठी जागतिक चिंतेच्या मुद्यांवर जी-20 नेत्यांशी संवाद साधण्यासाठीचा एक अधिकृत मंच आहे. सी-20 परिषदेत अनेक महिला प्रतिनिधींची उपस्थिती स्रीपुरूष असमानता बाद ठरवत आणि निर्णय प्रक्रियेतील महिलांचे वाढता सहभाग अधोरेखित करतो. संपूर्ण जगावर परिणाम करणाऱ्या या परिषदेत महिलांचा आवाज आणि दृष्टीकोन यांचे प्रतिनिधित्व दिसून आले. नागपुरातील सी-20 परिषदेत सिव्हील सोसायटीच्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी यांच्यासह उल्लेखनीय सहभाग नोंदविलेल्या महिलांमध्ये अमेरिका येथील क्लिंटन हेल्थ ऍक्सेस इनिशियेटिव्हच्या डॉ. अँडी कार्मोन, ट्रॉयका सदस्य आणि ब्राझिलमधील गेस्टोसच्या अलेक्झांड्रा निलो, नेदरलँड येथील पर्यावरण तंत्रज्ञानाच्या अभ्यासक डॉ. मेर्ले डे क्रुक, इंटेल कॉर्पोरेशनच्या संचालक ॲलिसन लेन रिचर्डस, आयसीपीसी ग्लोबल फाउंडेशनच्या विकास संचालक वेर्निका सोबोलेवा, स्वामी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्ष तथा सी-20 सुकाणू समितीच्या सदस्य निवेदीता भिडे, पीपल्स वर्ल्ड कमिशन ऑन फ्लड अँड ड्रॉउट या संस्थेच्या आयुक्त इंदिरा खुराना, डॉ. प्रिया नायर, अमृता विश्वविद्यापीठमच्या डॉ. मनीषा सुधीर, सत्संग फाउंडेशनच्या राष्ट्रीय समन्वयक वासुकी कल्याणसुंदरम आदिंचा समावेश होता
सी-20 परिषदेत महिलांचा लक्षणीय सहभाग
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com