प.बंगालचा शुभा विश्वास, आसामची रिशा सैकायी प्रथम, एकल अभियान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

नागपूर :- पश्चिम बंगालचा शुभा विश्वास आणि आसामची रिशा सैकायी यांनी मुले व मुलींच्या 100 मीटर शर्यतीत प्रथम क्रमांक पटकाविला. एकल अभियान अभ्युदय युथ क्लबच्या वतीने आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये दोन्ही खेळाडूंनी यश संपादित केले.

अमरावती मार्गावरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या क्रीडांगणावर शनिवारी (ता.20) पार पडलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये मुलांच्या 100 मीटर शर्यतीत पश्चिम बंगालच्या शुभा विश्वासने 12.27 सेकंदाची सर्वोत्तम वेळ नोंदवित पहिले स्थान प्राप्त केले. त्यापाठोपाठ उत्तराखंडच्या अमर सिंगने 12.57 सेकंद आणि दक्षिण बिहारच्या विक्की कुमारने 12.74 सेकंद ही वेळ नोंदवित दुसरे व तिसरे स्थान पटकाविले.

मुलींच्या गटात आसामच्या रिशा सैकायीने 14.05 सेकंदात 100 मीटर अंतर गाठून पहिला क्रमांक पटकाविला. यापाठोपाठ पश्चिम बंगालची श्रुती सताराने 14.36 सेकंद आणि पश्चिम उत्तरप्रदेशच्या दिव्यांशी ने 14.66 सेकंदाच्या वेळेसह दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला.

लांब उडीमध्ये युपी ची खुशी खातना व पुर्व पुर्वोत्तरचा राहुल पेगू प्रथम

लांब उडीमध्ये मुलींमध्ये पश्चिम उत्तरप्रदेशची खुशी खातना पहिली आली. खुशीने 4.46 मीटर हे सर्वोत्तम अंतर गाठत पहिले स्थान प्राप्त केले. यापाठोपाठ दक्षिण उत्तरप्रदेशच्या राणी कुशवाहने 4.44 मीटरसह दुसरे आणि पुर्व पुर्वोत्तर येथील दिपिका पाचुंगने 4.43 मीटरसह तिसरे स्थान प्राप्त केले. मुलांमध्ये पुर्व पुर्वेत्तरचा राहुल पेगू पहिला, उत्तर हिमाचलचा आर्यन कौशल दुसरा आणि दक्षिण झारखंडचा धनंजय पूरन तिसरा आला.

निकाल (प्रथम पाच)

मुले : 100 मीटर दौड

शुभा विश्वास (पं.बंगाल) 12.27, अमर सिंग (उत्तराखंड) 12.57, विक्की कुमार (दक्षिण बिहार) 12.74, प्रवीण सोने (पं.बंगाल), 13.02, बी. मनीकंठ (आंध्रप्रदेश) 13.25.

मुली: 100 मीटर दौड

रिशा सैकायी (आसाम) 14.05, श्रुती सतारा (प.बंगाल) 14.36, दिव्यांशी (पश्चिम उत्तर प्रदेश) 14.66, पवित्रा (कर्नाटक) 14.88, श्रेया सुधेबर (महाराष्ट्र) 15.20.

मुली : लांब उडी

खुशी खातना (पश्चिम उत्तरप्रदेश) 4.46 मीटर, राणी कुशवाह (दक्षिण उत्तरप्रदेश) 4.44 मी., दिपिका पाचुंग (पुर्व पुर्वोत्तर) 4.43 मी., मल्लीका रॉय 4.30 मी., सीता गौतम 4.27 मी.

मुले : लांब उडी

राहुल पेगू (पुर्व पुर्वेत्तर) 6.24 मी., आर्यन कौशल (उत्तर हिमाचल) 6.03 मी., धनंजय पूरन (दक्षिण झारखंड) 6 मी.

रविवार 21 जानेवारी रोजीचे सामने

400 मीटर दौड

200 मीटर दौड

उंच उडी

कुस्ती

कबड्डी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदर्भाला सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी औद्योगिक विकास महत्त्वाचा - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

Sat Jan 20 , 2024
– 27 ते 29 जानेवारी 2024 दरम्यान ‘खासदार औद्योगिक महोत्सव – अॅडव्हान्टेज विदर्भ’ चे नागपुरात आयोजन नागपूर :- विदर्भाला सर्वच क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भर करण्यासाठी औद्योगिक विकास महत्त्वाचा आहे याच हेतूने विदर्भातील औद्योगिक क्षमता विकसित करणे ,तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, स्टार्टअप्स आणि उद्यमशीलतेला चालना देणे, विक्रेता विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करून देणे, रोजगारासाठी नवकल्पना आणि पोषक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com