उमरेड :- अंतर्गत ०४ कि.मी अंतरावर पिरावा शिवार येथे दिनांक १५/०५/२०२३ ०७.०० वा. ते १०.०० वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे- गणेश तुकाराम काळसर्पे, वय ३५ वर्ष, रा. खापरी पोस्ट डव्हा ता. उमरेड जि. नागपुर व मृतक नामे- तुकाराम धोंडवा काळसर्पे, वय ७० वर्ष रा. खापरी पोस्ट उन्हा ता. उमरेड जि. नागपुर हे मुलगा व वडील असुन एक अनोळखी इसम वय अंदाजे २५ ते ३० वर्ष हा मृतकाचे शेतातील गोठयात दोन ते तीन आठवडयापुर्वी तसेच घटने रोजी आल्याने फिर्यादी आरोपीस चेहऱ्याने ओळखतो. तसेच यातील आरोपी अनोळखी ईसम याने अज्ञात कारणावरून मृतकास त्याचे खापरी शिवारातील शेतामधील जनावरांच्या गोठयातून घटनास्थळी पिरावा शिवारात मोटरसायकलने नेवुन मृतकाचे पांढऱ्या रगाच्या लाल झरी असलेल्या कापडी दुपट्टयाने गळा घट्ट आवळून जिवाने ठार मारले आहे. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. उमरेड येथे आरोपीविरुध्द कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र वाप पोस्टे उमरेड हे करीत आहे.