नागपूर :- गोरक्षणाच्या नावाखाली राज्य व केंद्र सरकारकडून करोडो रुपयांचे अनुदान लाटणाऱ्या धंतोली येथील गोरक्षण करणाऱ्या संस्थांची व त्यातील गोमातांची? दशा काय आहे हे या चित्रावरून लक्षात येते.
नागपुरात 32 च्या वर तापमान असताना या सरकारी गोमाता? मात्र दिवसभर खुल्या मैदानात उन्हात तापत असतात. यांच्यासाठी कुठेही सावलीची व्यवस्था नाही. जुन्या गोरक्षण च्या ठिकाणी तात्पुरते शेड आहे. पण या शेड च्या मागील भागात व धंतोली पेट्रोल पंप च्या मागे नवीन अतिक्रमणीत मैदानात तात्पुरत्या कंपाऊंडच्या आतमध्ये गाई ढोरांचा मुक्त संचार आहे. जागेच्या कब्जासाठी तर हे नाही ना?
यापूर्वी कोविड काळात अनेक गुरे मृत्युमुखी पडले. नुकत्याच मुंबईत उष्माघाताने अनेक व्यक्तींचे बळी गेले. ज्यांच्या मुलांचे राज्य व केंद्रात सरकार आहे त्यांच्या मातांचे म्हणजेच गोमातांचे बळी जाऊ नये एवढेच!
– उत्तम शेवडे