ठाण्यात होणार ‘शिवशक्ति-भीमशक्ति’चा जंगी महा-मेळावा – जयदीप कवाडे

– पहिल्या भव्य सभेच्या पार्श्वभूमीवर जयदीप कवाडेंची मंत्री शंभुराज देसाईंशी चर्चा

मुंबई/नागपुर :- पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि शिवसेना पक्षात राजकीय युती (मैत्री) झाली असून शुक्रवारी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी शिवसेना नेते,राज्याचे कैबिनेट मंत्री तसेच ठाणे जिल्हाचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. राज्यात पहिला शिवशक्ति-भीमशक्ति जंगी महा-मेळावा ठाणे येथे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा केली. देशात सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेले दुसरे राज्य महाराष्ट्र असून 48 जागांमध्ये 45 च्यावर जागा जिंकण्याचा निर्धार महायुतीने केला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी पूर्ण ताकदीने प्रचार करणार, असा विश्वास ‘पीरिपा’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केला. राज्यात ‘शिवशक्ति-भीमशक्ति’चा मोठा जनाधार हा आगामी लोकसभेत महत्त्वाची भूमिका ठेवणार आहे. या संदर्भात राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वात ‘पीरिपा’चे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.‘पीरिपा’चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाड़े यांनी शंभूराज देसाई यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

प्रसिद्धी पत्रकाद्वारे जयदीप कवाडेंनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोंदींच्या नेतृत्वात महायुती येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत 400 हून अधिक जागा जिंकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंदीना तिसऱ्यांदा देशाचे नेतृत्व मिळविण्याकरिता राज्यातून 45 जागा जिंकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संपूर्ण बळ लावत आहे. ‘पीरिपा’घटक पक्ष हा संपूर्णपणे महायुतीसोबत राज्यातील सर्वच उमेदवारांच्या प्रचार करणार आहे. राज्यातील रिपब्लिकन, बहुजन, वंचित तसेच आंबेडकरवादी प्रामाणिक मतदात्यांचा विश्वास मिळविण्यासाठी ‘शिवशक्ति-भीमशक्ति’ मेळावा सर्वच ठिकाणी होने गरजेचे आहे. त्यानुसा ‘पीरिपा’ने पूर्णपणे तयारी केली आहे. महाराष्ट्र हे महापुरूषांच्या विचारांची भूमी असून आतापर्यंत इथला जागरूक मतदार हा नेहमीच ‘पीरिपा’सोबत राहिला आहे. राज्याच्या या मतदारांची दीक्षाभूल करण्याचे काम जरी महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ‘शिवशक्ति-भीमशक्ति’चे मेळावे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळवून देणार नाही. त्यासाठी ‘पीरिपा’ पूर्ण ताकदीने प्रचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेची हॅट्ट्रीक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महायुतीच्या सर्वच उमेदवारांना ‘पीरिपा’चा पूर्ण पाठिंबा असून ते जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वासही जयदीप कवाडे यांनी व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वर्धमान नगर येथील प्लास्टिक कंपनीवर मनपाची कारवाई, छापा टाकून जप्त केला दोन हजार किलो प्लास्टिक

Fri Mar 22 , 2024
नागपूर :- महाराष्ट्र राज्यात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी असताना सुद्धा नागपुरात सर्रास कॅरी बॅगची निर्मिती करणा-या वर्धमान नगर येथील रिद्धी सिद्धी प्लास्टिक कंपनीवर नागपूर महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभागाने शुक्रवारी (ता.२२) छापा टाकून कारवाई केली. नागपूर महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे संयुक्तरित्या करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये २२०९ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या प्लास्टिकची अंदाजे किंमत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights