संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कन्हान : – शिवबा राजे करिअर अकॅडमी व्दारे समाज भवन कन्हान येथे महापरिनिर्वाहन दिना निमित्य डॉ बाबासाहेबाना अभिवादन करण्यात आले.
दरवर्षी ६ डिसेंबर हा दिवस भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेड कर चा पुण्यतिथी दिवस म्हणुन साजरा केला जातो. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन (दि.६) डिसेंबर १९५६ ला झाले. बाबा साहेबांची पुण्यतिथी देशभरात ‘महापरिनिर्वाण दिन म्हणुन साजरा केला जातो. समाज भवन कन्हान येथे डॉ बाबासाहेब आबेंडकर यांच्या प्रतिमेस मा. योगेश बर्वे सर, फिजीकल ट्रेनर अभिजित चांदुरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संविधान निर्माता डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाज सुधारक व अभ्यासक होते. त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य जातिवाद दूर कर ण्यासाठी तसेच गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नती साठी समर्पित केले. आंबेडकरांनी १९५६ साली बौद्ध धर्माचा स्विकार केला. असे उपस्थिताना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यार्थी भारती पोचपोंगडे, दिव्या केने, आकांक्षा खंडाते, अलिशा सहारे,कांचन लोखंडे, अंशिका चौरे, साक्षी हूड, प्रदीप बंड, जय दारोडे, अनिकेत निमजे, शुभम इंगोले, तुषार धांडे आदि सह शिवबा अकॅडमीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक वृंद उपस्थिती होते.