शिंदे गटाच्या नेत्याचं शिवसेना पक्षाबाबतचं विधान वादाच्या भोवऱ्यात

मुंबई :- राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. ऐन निवडणूक काळात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने स्वत : च्याच पक्षाबाबत केलेलं विधान आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. शिवसेना ही सुंदर स्त्री आहे. पण गळ्यात मंगळसूत्र नसल्यामुळे आज तिचे लचके तोडले जात आहेत, असं विधान शिंदे गटाचे नेते सदानंद चव्हाण यांनी केलं आहे. सदानंद चव्हाण हे माजी आमदार आहेत. शिवसेनेच्या माजी आमदाराने शिवसेनेची तुलना करताना वादग्रस्त विधान केलं आहे. लायसन्स आणि मंगळसूत्र नसल्यामुळे आता शिवसेनेला कोणीही शिट्या मारेल, असं सदानंद चव्हाण यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाली नसल्यामुळे नाराज आहेत. माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्याकडून नाराजी व्यक्त करताना शिवसेनेचा मंगळसूत्र नसलेली सुंदर स्त्री म्हणून उल्लेख केला आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. सदानंद चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Credit by tv9 marthi

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मध्यरात्री 12.42 वाजेपर्यंत निवडणूक विभागाकडून प्राप्त झालेली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची पक्षनिहाय यादी...

Wed Oct 30 , 2024
– (नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, रामटेक, उमरेड आणि कामठी) 56- नागपूर पश्चिम :– सुहास राऊळकर ( अपक्ष), अलका पोपटकर ( अपक्ष), सुधाकर कोहळे ( भारतीय जनता पार्टी), यशवंत तेलंग ( भीम सेना), नरेश बरडे (अपक्ष), विकास ठाकरे ( इंडियन नॅशनल काँग्रेस), नरेंद्र वालदे ( बहुजन समाज पक्ष), नरेंद्र जिचकर ( अपक्ष), हेमंत पांडे ( अपक्ष), मनोज गजभिये ( बहुजन समाज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!