काल परवा पत्रकार मधुकर भावे यांनी लिहून ठेवलय कि डीलर अशोक चव्हाण आता लीडर झालेत, आणि ते अख्य्या लेखातून नेहमीप्रमाणे भाजपावर घसरले, मधुकर भावे जिकडे तिकडे वाटोळे ठरलेले म्हणूनच आपले वाटोळे होण्याआधी दर्डा बंधूंनी भावेंना त्यांच्या लोकमत दैनिकातून घालवले, बरे झाले, कारण भावे असते तर दर्डांचे पण वाटोळे झाले असते, भावे यांना घालविल्यानंतर हाकलून लावल्यानंतर दर्डा साऱ्याच क्षेत्रात अधिक मोठे झाले. एड्स झाल्याचे लक्षात येताच एका व्यावसायिकाने त्याच्या नटी असलेल्या बायकोला घटस्फोट दिला त्यामुळे तो वाचला नंतर त्या नटीशी पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या नेत्याने तिच्या सौंदर्यावर भाळून लग्न केले त्याला अर्थातच पुढल्या काही दिवसात एड्स झाला. दिवंगत विलासराव देशमुखांवरून मला हि सत्य घटना आठवली म्हणजे मधुकर भावेंना लोकमत दैनिकातून घालविल्यामुळे हाकलल्यामुळे दर्डा वाचले पण भावेंच्या मधुर लबाड चतुर बोलण्याला विलासराव देशमुख भाळले फसले किंवा शब्दात अडकले म्हणणे अधिक संयुक्तिक कारण देशमुख यांनी भावे यांना जवळ घेतले, लातूरला काढलेल्या आपल्या दैनिकात संपादक म्हणून नेमले आणि आधी दैनिक बंद पडले पुढे विलासराव व्यक्तीश: अचानक सत्तेतून घरी बसले पण भावेंचा पायगुण विलासरावांच्याही ध्यानात येताच त्यांनी देखील भावेंना श्रीखंडातुन माशी काढल्यासारखे अलगद बाजूला काढले अर्थातच राजकारणात विलासरावांचा पुन्हा उत्कर्ष झाला त्यानंतर भटके मधुकर भावे पनवेलच्या रामशेठ ठाकूरांना बिलगले, भावेंच्या चतुर आणि मिठ्ठास बोलण्याला मग रामशेठ देखील भुलले भावेंवर फिदा झाले येथेही नेहमीप्रमाणे तेच घडले, बलाढ्य रामशेठ वृत्तपत्र सृष्टीत राजेश खन्ना किंवा देवानंदच्या बहुसंख्य चित्रपटासारखे एकदम फ्लॉप झाले. आयुष्यात अनेकदा लग्न करणारी एखादी दुर्दैवी स्त्री जशी लग्न केल्यानंतर काहीच दिवसात विधवा होते, मधुकर भावेंना जवळ घेणाऱ्या वृत्तपत्र मालकांचे किंवा नेत्यांचे हे असे त्या सतत विधवा होणाऱ्या स्त्रीसारखे होत असते त्यामुळे जसे भावे यांना आधी काँग्रेसने जवळ घेतल्यानंतर राज्यातली देशातली काँग्रेस बरबाद झाली, संपली. एरवी मधुकर भावे यांचा सतत राग राग करणार्या शरद पवार यांना देखील दुर्बुद्धी झाली आणि एरवी पारखी निरखी असणाऱ्या शरद पवार यांनी ज्या क्षणी मधुकर भावे यांना जवळ घेतले, जानी दुश्मन सिनेमात जशी नव्याने लग्न झालेली दुल्हन मौत के घाट उतरते तेच भावेंना जवळ घेण्याने शरद पवारांचे त्यांच्या राष्ट्रवादीचे आणि एरवी जोमात असणाऱ्या राजकीय कारकिर्दीचे झाले, केवळ मधुकर भावे हे एकमेव नाहीत दुसरे आणखी एक पत्रकार आहेत अनिल थत्ते, पत्रकार थत्ते हुबेहूब भावे कसे तो विषय येथे टाळतो पण या दोघांना ज्यांनी म्हणून जवळ घेतले त्यातला प्रत्येक लवकरच फार मोठ्या बर्बादीकडे मार्गस्थ झाला, अनिल थत्तेंना बिलगले, मी अनेकदा सूचित करूनही ज्यांनी माझे ऐकले नाही ते आनंद दिघे तर अल्पायुषी ठरले थेट देवाघरी गेले. पत्रकार मधुकर भावे यांच्यामुळे नेमके कोण कोण रस्त्यावर आले, कोणाचा कसा ‘ राही भिडे ‘ झाला, यादी आणखी लांबलचक आहे, पुन्हा त्यावर कधीतरी. बरे झाले कि मधुकर भावे भाजपा विरोधात आहेत त्यामुळे भाजपा खूप मोठी झाली, दुर्दैवाने चुकून भावे भाजपा विचारसरणीचे असते तर राज्यातल्या भाजपाचा देखील हमखास शरद पवार किंवा आचार्य अत्रे नक्की झाला असता, वाटोळेच झाले असते. मधुकर भावे अशोक चव्हाण आणि भाजपावर जे घसरले आहेत जागेअभावी मी तो विषय आज घेत नाही पण त्यावर देखील पुढे एकदा खरपूस समाचार घेणार आहेच…
अलीकडे एके दिवशी दिवसभर विविध वाहिन्यांनी एकच हल्लकल्लोळ केला कि लवकरच शरद पवार आपल्या उरल्या सुरल्या राष्ट्रवादीसहित काँग्रेसवासी होणार आहेत त्यावर मग वाहिन्यांनी आणि त्यावरच्या बोल बच्चन मंडळींनी मोठा गलका केला, एवढा गोंधळ घातला कि सारेच्या सारे त्या मनोज जरांगे यांना किंवा इतर सार्या राजकीय घडामोडींना विसरले आणि पवारांच्या बातम्या अगदी कान देऊन ऐकू लागले तर काही चर्चेच्या गुऱ्हाळात उतरले, प्रकरण हाताबाहेर जाते आहे हे चाणाक्ष काका आजोबांच्या लक्षात येताच त्यांनी हळूच राष्ट्रवादीच्या निवडक आणि उरल्या सुरल्या नेत्यांची बैठक बोलावली त्यानंतर मग पवारांनी त्यांच्या लेकीने आणि नेत्यांनी बाहेर येऊन लगेच मीडियासमोर मुद्दाम येऊन सांगितले कि तुम्ही जे ऐकले ते तद्दन असत्य आहे, अफवा आहे, आम्ही काँग्रेस मध्ये जाण्याचे अजिबात ठरविलेले नाही याउलट जे काही अगदीच फाल्तुक चिन्ह आम्हाला घड्याळाऐवजी निवडायला सांगितले आहे त्यातले एक निवडून पुढे आमच्या राष्ट्रवादीला पोषक वातावरण आम्ही तयार करणार आहोत आणि रात्री झोपता झोपता तेही अत्यंत बिनभरवश्याच्या शरद पवारांवर भाबड्या मराठींनी विश्वास ठेवला आणि त्या दिवसाचा शरद पवार त्यांचा पक्ष विलीनीकरण विषय मूर्ख मीडियाने आणि भोळ्या जनतेने तेथल्या तेथे संपविला जो विषय पवारांच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने सुरु झाला. विशेष म्हणजे विलीनीकरणाचा इन्कार अगदी लगेच स्वतः शरद पवार मीडियासमोर येऊन करू शकले असते पण त्यांनी तसे न करता लगेचच पक्षाची बैठक बोलावली कारण बातमीत तथ्य होते. विलीनीकरणाची बातमी पवार विरोधकांनी नव्हे तर पवारांनी स्वतःच यासाठी पेरली कारण त्यांना इतर नेत्यांची प्रतिक्रिया आणि जनतेचा कौल नेमका जाणून घ्यायचा होता जो त्यांनी नक्की जाणून घेतला. अत्यंत महत्वाचे म्हणजे आणि माझी नेमकी माहिती अशी कि विलीनीकरणाची बातमी खरी आहे आणि तुम्हाला तर ते माहित आहे कि पवार जे बोलतात त्याच्या नेमके उलटे करतात म्हणजे तरुण वयात समजा ते म्हणाले असते कि मी सायरा बानूशी लग्न करतो आहे, काही दिवसानंतर हेच पवार नसीम बानूशी लग्न करून मोकळे झाले असते. जे शरदराव आजही ज्या प्रतिभा पवारांना नेमके समजलेले नाहीत ते तुम्हा आम्हा कोणालाही कधीच कळणार नाहीत ज्यात त्यांचे आजचे फार मोठे राजकीय अपयश दडलेले आहे. म्हणून नेमके सत्य हेच कि ज्याचा पवारांनी इंकार केला त्याउलट नक्की घडणार आहे, इतर सारे मार्ग बंद झाल्याने त्यांच्यासमोर आपल्या पश्चात केवळ लेकीच्या भल्यासाठी काँग्रेस मध्ये उरलेल्या राष्ट्रवादीचे विलीनीकरण हाच पर्याय व उपाय आहे जे नेमके नक्की घडणार आहे. वाटाघाटी सुरु आहेत पण यावेळी सोनिया गांधी यांच्या अटी काहीशा जाचक काहीशा घातक असल्याने विलीनीकरणात काही दिवस आणखी विलंब होईल एवढेच. शरद पवार आणि पत्रकार निखिल वागळे या दोघात साम्य कसे कोणते तो विषय देखील मी पुढे लवकरच घेणार आहे…
अपूर्ण : हेमंत जोशी