नागपूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षपूर्ती निमित्त संघमित्रा सेवा प्रतिष्ठान द्वारे “नेत्री सम्मेलन आगामी काळात आयोजित केले आहे. नागपुरातील विविध क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या महिलांमध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने हे सम्मेलन होणार आहे.
अश्याच एका कर्तृत्ववान नेत्रीला भेटण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा योग या नेत्री सम्मेलनाच्या आयोजक चमूला मिळाला.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) इथे शास्त्र म्हणून कार्यरत आणि नागपूरची स्नुषा डॉ. माधवी ठाकरे या आहेत. मूळच्या मूर्तिजापूरच्या अमरावती इथे शिक्षण घेऊन डॉ. माधवी यांनी 2010 मध्ये ISRO मध्ये आपले काम सुरू केले. भारताचे अभिमान असलेले चंद्रयान 3 या यशस्वी अभियानात डॉ. माधवी यांचे मोलाचे योगदान आहे.
डॉ. माधवी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला सदिच्छा भेट देऊन नेत्री चमूने माधवी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. नेत्री सम्मेलनाचे अगत्याचे आमंत्रण त्यांना दिले त्यांच्याशी संवाद साधतांना त्यांनी सांगितले की “इतक्या महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या मोहिमेवर काम करताना घरातील व्याप सांभाळून काम करणे ही तारेवरची कसरत असते. पण दोन्ही परिवाराचे सहकार्य देखील तितकेच महत्वाचे असते आणि ते मला मिळाले म्हणून आज या यशात मी सहभागी आहे” त्यांच्या सासूबाईबद्दल बोलताना म्हणाल्या की ” त्या माझी जवळची मैत्रीण आहे. आशा ठाकरे यांना देखील आपल्या सुनेबद्दल खूप कौतुक आहे. “इतक्या मोठ्या पदावर असूनही सगळे सण व्यवस्थित करून आपले काम करते” असे त्या म्हणाल्या.
आशताईचे देखील भेट देऊन नेत्री चमूने स्वागत केले. ठाकरे परिवारासाठी आणि संपूर्ण नागपूरकरासाठी एक अभिमानाचा क्षण सगळ्यांना अनुभवायला मिळाला.
या वेळेला नेत्री सम्मेलन समूहाच्या समन्वयीका ऍड. पद्मा चांदे, डॉ. वासंती देशपांडे, सह संयोजिका अर्चिता पांडे, वर्षा ठाकरे, मनीषा काशीकर, श्रुती गांधी, वृषाली पुणेकर, सुनिता माउंदेकर उपस्थित होत्या.