संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मागील दोन दिवसांपासून सायंकाळी 5 ते 6 दरम्यान कामठी तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटी पाऊस झाल्यामुळे कामठी तालुक्यातील बहुतांश गावातील रब्बी पिकातील गहू तसेच भाजीपाला पिकाचे अतोनात नुकसान झाले.
कामठी तालुक्यातील रब्बी पिकाच्या पेरणी अहवालानुसार एकूण .618.50 हॅकटर क्षेत्रामध्ये रब्बी पिकाची पेरणी करण्यात आली.ज्यामध्ये कामठी तालुक्यातील कामठी कोराडी,महालगाव,वडोदा व तरोडी बु या महसूल मंडळात उन्हाळी धान 50.90 हॅकटर सोयाबीन 4 हॅकटर,भाजीपाला 368 हॅकटर,चारा पिके 115.60हॅकटर,फुलपीके 57.40हॅकटर,टमाटर 8 हॅकटर,खरबूज 3.50हॅकटर,धने 5 हॅकटर,मूग 6.10 हॅकटर मध्ये पेरणी करण्यात आली.
झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे काढणीस आलेल्या गहू पिकाचे चांगलेच नुकसान झाले तसेच कापूस व भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली आहे.तेव्हा या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे तवरीत पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, जी प सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे, कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे,येरखेडा ग्रा प सरपंच सारिता रंगारी, पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी, ग्रा प सदस्य सतीश दहाट तसेच भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान,कपिल गायधने,चंद्रशेखर तूप्पट, रमेश चिकटे, विजय कोंडुलवार,पंकज वर्मा, लालू यादव, प्रमेन्द्र यादव,प्रमोद वर्णम,बहुजन रिपब्लिकन एकता मंच चे अजय कदम,संदीप कांबळे, , दिपंकर गणवीर,उदास बन्सोड,सुभाष सोमकुवर, अनुभव पाटील,मनीष डोंगरे तसेच वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी नरेंद्र वाघमारे, प्रशांत नगरकर, दीपक वासनिक, प्रमोद उर्फ दादा कांबळे, विदेश डोंगरे आदींनी केले आहे.