संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कामठी बस स्थांनकात गर्दीचा फायदा घेऊन बस मध्ये बसनाऱ्या प्रवाशांच्या सोन्याचे दागीने व साहित्य चोरणाऱ्या महिला चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असून काल दुपारी 3 दरम्यान कामठी बस स्थानकातील बस मध्ये चढत असलेल्या एका महिला प्रवाशीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करीत असलेल्या चोरट्या वृद्ध महिलेस प्रवाशांनी पकडून कामठी पोलिसांच्या स्वाधीन केले .यासंदर्भात फिर्यादी प्रवासी भागेरथी भगवान सोमनाथे वय 60 वर्षे रा काचूरवाही ता रामटेक ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून आरोपी महिला केशर गोविंदा पाथरे वय 70 वर्षे रा कळमना मार्केट नागपूर विरुद्ध भादवी कलम 379 ,511 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.
उल्लेखनिय आहे की सदर फिर्यादी महिला ह्या आपल्या इंनबाई च्या चौदावी चा कार्यक्रम आटोपून परत घरी जाण्यासाठी कामठी बस स्टँड मधून बस मध्ये जात असता गर्दीचा फायदा घेत सदर वृद्ध महिला आरोपीने संधीचा फायदा घेत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच सदर फिर्यादीला लक्षात येताच प्रवाशी च्या सहाय्याने वाहतूक नियंत्रक रोशन खुर्गे यांच्या पुढाकारातून सदर महिला आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले तर काही दिवसापूर्वी मौदा बस स्थानकात प्रवाशीचे सोन्याचे दागिने चोरताना अटक करण्यात आले होते हे इथं विशेष!