मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी ज्येष्ठ नागरिकांची पदयात्रा

– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष उपक्रम

– पदयात्रेतील प्रत्येक पाऊल मतदार साक्षरतेसाठी महत्त्वाचे

– डॉ. विपीन इटनकर

नागपूर :- स्वीप अंतर्गत नागपूर जिल्हयात मतदार जागृती व साक्षरतेसाठी विविध प्रकारच्या उपक्रमातून भर देण्यात आला आहे. युवा मतदारांसमवेत ज्येष्ठ मतदारांनी मतदान करुन आपल्या कर्तव्याचे पालन करावे यासाठी सिनीयर सिटीजन कौंसिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्ट, पतंजली योग समिती, अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती, ज्येष्ठ नागरिक मंडळ, विदर्भ अवार्ड विनर वेलफेअर असोसिएशन, विदर्भ कलाकर संघाच्या प्रतिनिधींनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पदयात्रा काढली. मानेवाडा चौक ते उदय नगर चौकातील उद्यानापर्यंतच्या या पदयात्रेत अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.

डॉ. विपीन इटनकर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी विविध ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या मतदार जागरात उत्स्फूर्त सहभागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पदयात्रेतील प्रत्येक पाऊल हे सशक्त नागरिकीकरण व मतदार साक्षरतेसाठी महत्त्वाचे असून युवा पिढी समवेत ज्येष्ठांचा मतदानातील सहभागातून आपण 75 टक्के मतदानाचे लक्ष गाठू असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी त्यांचा संदेश वाचून दाखविला. निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.

समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी मानेवाडा चौक येथे या पदयात्रेला हिरवी झेंडी दाखविली. उदय नगर येथील उद्यानात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सिनीयर सिटीजन कौंसिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्टचे अध्यक्ष मनोहरराव खर्चे, सचिव सुरेश रेवतकर, हरिष देशमुख, ॲड नामदेवराव फटिंग, गुलाबराव उमाटे, ढेबू मेश्राम, माधुरी भुजाडे, महादेवराव बोराडे, सुधाकर शर्मा, अरविंदराव गुंठेवार, पदमाकर आगरकर, कवडू लाखे, उद्धव बडगे, सुनिता मेश्राम, सविता गाटकिने, माधूरी ढोले, शोभा सोनटक्के यांचा विशेष सहभाग होता. डेबू मेश्राम व त्यांच्या सहकार्यांनी पदयात्रेत संभळ वाद्यासह मतदान जागृतीचे गित सादर करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रगिताने पदयात्रेचा समारोप झाला. जेष्ठांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मनोहरराव खर्चे यांनी आभार मानले.

पदयात्रा यशस्वितेकरीता डॉ. मनोहर तांबुलकर, वसंतराव पाटील, मधुकर पाठक, भगवान टिचकुले, काशिनाथ धांडे, श्रीमती प्रमिलाताई राऊत, गीता महाकाळकर, माधुरी भुजाडे, मनोहर तुपकर,मारोती गिरीपुंजे, डा जगदोश बारसागडे, पुरूषोत्तम साठवणे, साई नागदेवे, अधिर बागडे, पंढरीनाथ सालीगुंजेवार, सरोज मेश्राम, आरती वाटकर, मकवाना, श्रीराम दुरुगकर, संजय अस्वले, प्रदीप धुमाळ, गोहोते, मुन मॅडम यांचे सहकार्य लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गृह मतदानाला नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघापासून सुरुवात

Mon Apr 15 , 2024
– वसंत ढोमणे ठरले पहिले गृह मतदार नागपूर :- भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील नागरिक तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यात 14 एप्रिलपासून गृह मतदानाला नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून सुरुवात झाली. नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातील डायमंड नगर येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक वसंत ढोमणे यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com