नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात ज्येष्ठ नागरिकांनी शुक्रवारी (ता.19) विविध स्पर्धांचा आनंद घेतला. वयोगट 60 ते 70, 71 ते 80 अणि 81च्या वर अशा वयोगटामध्ये व्हीएनआयटी च्या मैदानात ज्येष्ठांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.