नागपूर :-पटवर्धन हायस्कूल येथे 1979 या वर्षी दहाव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे संमेलन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. यावेळी एकूण तीस माजी विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण कामे बाजूला ठेवत या कार्यक्रमात उत्साहाने सामील झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे संपूर्ण विद्यार्थी पटवर्धन हायस्कूलमध्ये एकत्र आले. यावेळी त्यांनी त्यांना शिकविणाऱ्या त्यावेळच्या शिक्षक -शिक्षिकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. त्यांनी केलेल्या विद्यादानामुळे आज आम्ही ज्या जागी पोहोचलो आहोत त्याबद्दल आम्ही या शिक्षकांचे ऋणी आहोत अशी भावना व्यक्त केली. या 44 वर्षात काही विद्यार्थी मित्र काळाच्या ओघात आपल्यातून निघून गेले त्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात आलेल्या सुखदुःखांचा उल्लेख करून आपले अनुभव सांगितले.
सुधीर मोकासे आणि उदय मोगलेवार यांच्या मार्गदर्शनात अक्षय फॉर्म, आमगाव देवळी सावंगी, हिंगणा येथे आयोजित या कार्यक्रमाचे संचालन मुंबई येथून आलेले शरद जोशी यांनी केले. आभार उदय मोगलेवार यांनी मानले.
या संमेलनात पटवर्धन हायस्कूल चे दहावीचे 1979 बैच चे विद्यार्थी मिलिंद घुई, गिरीश दांडेकर, शाम बोक्षे, दीपक वाठ, विश्राम जोशी, किरण बोबडे, कैलास अग्रवाल, राजीव दम्मानी, संजय पुगलिया, शरद जोशी, तुकाराम माथणीकर, शरद मोहिले, प्रमोद भोयर, पद्माकर भेलकर, सुहास जांभूळकर, चंद्रकांत घोडमारे, सतीश बाकडे, यशवंत शेंडे, पुरुषोत्तम चोपडे, विश्वनाथ झुलकंटीवार, दिनेश घोटेकर, श्याम हेडाऊ, आनंद नगरारे, प्रवीण गजघाटे, निशिकांत ओरके, सुधीर मोकासे, उदय मोगलेवार, हेमंत गोरले आणी के. उत्तमराव उपस्थित होते.