वाहन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस, आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे सोनेगाव हद्दीत, जयप्रकाश नगर मेट्रोस्टेशन, नागपूर येथे फिर्यादी प्रणय अशोक भजणे, वय २५ वर्षे, रा. परीक्षम अपार्टमेंट जवळ, नरेंद्र नगर, नागपुर यांनी आपली हिरो होंडा शाईन गाडी क. एम. एच. ३५, ए.वि. ३६२७ किंमती अंदाजे ३०,०००/-रु. ची हॅन्डल लॉक करून पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची नमुद गाडी चोरून नेली. अशा फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस ठाणे सोनेगाव येथे कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाच्या समांतर तपासादरम्यान, गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आरोपी नामे स्वप्नील सिध्दार्थ वैद्य, वय ३० वर्षे, रा. गाव चाना, बोरटोला, तह. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदीया यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमूद दुवाकी गाडी चोरी केल्याचे कबुल केले. आरोपीचे ताव्यातुन गुन्हयात पोरी गेलेले वाहन किमती अंदाजे ३०,०००/- रू. जप्त करण्यात आले. आरोपीस सखोल विचारपुस केली असता, त्याने पोलीस ठाणे ब्रम्हपुरी हद्दीतुन जि. चंद्रपुर येथुन एक हिरो होंडा शाईन क. एम. एच. ३४, बि.ई. ७९०५ किंमती अंदाजे २०,०००/-रु. ची चोरी केल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातून दोन्ही गुन्‌ह्यातील वाहने एकुण किंमती ५०,०००/-रू. चा मुद्देमाल जप्त करून, दोन वाहनचोरीचे गुन्हे उपडकीस आणण्यात आले. आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाई कामी सोनेगाव पोलीसांचे ताब्यात दिले आहे. पुढील तपास सुरू आहे. वरील कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) यांचे मार्गदर्शनात, युनिट क. २ चे सपोनि, बांभारे, पोउपनि, मनोज राऊत, पोहवा दिपक चोले, नापोअं अर्जुन यादव, महेंद्र सडमाके, दिनेश डबरे, व पोअं संदीप पांडे, मंगल जाधव व विवेक त्रिपाद यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी तसेच, खंडणी मागणारे आरोपी यांचे एकमेकांविरूध्द गुन्हे दाखल, एकूण ६ आरोपींना अटक

Thu Apr 4 , 2024
नागपूर :-पोलीस ठाणे सिताबर्डी ह‌द्दीत आनंद नगर, न्यु बॉम्बे स्कुटर शॉप मागे, सिताबर्डी येथे राहणारा मृणाल मथुर गजभिये, वय २९ वर्षे, याचा ४ ते ५ महीन्यापासुन जैन्युअल सलिम कुरैशी, वय ३० वर्षे, रा. गड्‌डीगोदाम, नागपुर याचेसोबत पैशाचे लेन-देन वरून वाद सुरू होता. दिनांक ०३.०४.२०२४ ने ०७.४५ वा. चे सुमारास, जैन्युअल कुरैशी, हा त्याचा मित्र नागे समिर दुधानकर, रा. हुडकेश्वर, नागपुरसह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com