सराईत गुन्हेगार प्रशांत उर्फ सोनु मुकेशसिंग सेंगर याला MPDA कायदयांतर्गत ०१ वर्षांकरीता केले स्थानबध्द

-(स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई)

अरोली :- पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येणाऱ्या इंदोरा ता. मौदा जि. नागपूर परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार प्रशांत उर्फ सोनु मुकेशसिंग सेंगर, वय ३४ वर्ष, रा. इंदोरा ता. मौदा जि. नागपूर हा मागील ५ वर्षांपासून अरोली, इंदोरा या परिसरात गुंडगिरी करुन शरीराविरूद्ध व मालमत्तेविरूद्ध गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. त्याच्या असामाजिक कृत्याची माहीती पोलीसांना देणाऱ्या लोकांमध्ये तो भय निर्माण करुन दहशत पसरवित असतो. नागपूर ग्रामीण पोलीसांना त्याचेविरुध्द जेव्हा जेव्हा तक्रारी प्राप्त झाल्या त्या त्या वेळी गंभीर दखल घेवून त्याचेविरुध्द गुन्हे नोंद केले व त्याला अटक केले आहे. परंतु प्रशांत उर्फ सोनु याचे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सुधारणा झाली नाही. त्याचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु प्रशांत उर्फ सोनू याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरुच ठेवली. प्रशांत उर्फ सोनु याचे कृत्य सामाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोहार यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण कडून MPDA कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली. दि. १०/१२/२०२३ रोजी मा. जिल्हाधिकारी, नागपूर यांनी सराईत गुन्हेगार प्रशांत उर्फ सोनु मुकेशसिंग सेंगर याचे विरुध्द स्थानबध्दता आदेश काढुन त्यास १ वर्षाकरीता स्थानबध्द केले.

सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस स्टेशन अरोली येथील ठाणेदार सहा, पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकुर, सहायक फौजदार सुरज परमार, पोलीस हवालदार निलेश वर्षे, पोलीस अंमलदार होमेश्वर वाईलकर यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धान चोरीच्या गुन्हयातील आरोपी गजाआड

Wed Dec 13 , 2023
– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई मौदा :- दिनांक ११/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पथक पो.स्टे. पोस्टे मौदा येथील अप. क्र. ११३८/२३ कलम ३७९ भादंवी ने गुन्ह्यात आरोपी शोध कामी फिरत असता धान चोरीच्या गुन्हया मधील आरोपी नामे- सुनील रिखीराम राय, वय ३४ वर्ष, रा. छीडीया पलारी ता.जी. शीवणी (mp) याचा शोध घेत असता खुमारी टोल नाक्यावरून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!