धान चोरीच्या गुन्हयातील आरोपी गजाआड

– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई

मौदा :- दिनांक ११/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पथक पो.स्टे. पोस्टे मौदा येथील अप. क्र. ११३८/२३ कलम ३७९ भादंवी ने गुन्ह्यात आरोपी शोध कामी फिरत असता धान चोरीच्या गुन्हया मधील आरोपी नामे- सुनील रिखीराम राय, वय ३४ वर्ष, रा. छीडीया पलारी ता.जी. शीवणी (mp) याचा शोध घेत असता खुमारी टोल नाक्यावरून एक बोलेरो पीकअप वाहन भरधाव वेगाने निघाले संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर वाहनाचा पाठलाग केला असता, सदर वाहनात बोऱ्यात भरून धान दिसुन आले. सदर बोलेरो पीकअप वाहन क्र. MH 29 BE 2185 चा चालक आरोपी नामे सुनील रिखीराम राय यास विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली असता चौकशी मध्ये सदर धान आसोली शिवारातील शेतातून ११ पोते चोरी केल्याचे कबुली दिली. याबाबत पो.स्टे. मौदा सदर प्रकरणा बाबत विचारणा केली असता पो.स्टे. मौदाला अप. क्र. ११३८/२३ कलम ३७९ भादवी गुन्हा दखल असल्याचे समजले सदर वाहन व आरोपी यास ताब्यात घेऊन सदर आरोपी यास जप्ती मुद्देमाल १) ११ धानाचे पोते किंमती ५०,०००/- रु. २) बोलेरो पिकअप क्र. MH 29 BE 2185 किंमती ५,०००००/- रु. एकूण किंमती ५,५०,०००/- रु. मुद्देमालासह पुढील तपासकामी पो.स्टे. मौदा यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कार्यवाही ही पोलीस अभिक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे पोलीस उपनिरीक्षक बटुलाल पांडे, सहायक फौजदार ज्ञानेश्वर राउत, पोलीस हवालदार विनोद काळे, इक्वाल शेख, पोलीस नायक संजय बरोदीया, विरेंद्र नरड, चालक मुकेश शुक्ला यांचे पथकाने केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

Wed Dec 13 , 2023
मौदा:- दिनांक ११/१२/२०२३ चे ११.०० वा. दरम्यान आरोपी नामे महेंद्र सुरेश आंबीलडुके रा. दहेगाव ता. मौदा हा फिर्यादीचे घराच्या आत प्रवेश करून फिर्यादीस अश्लिल इशारे करून जवळ बोलावत होता फिर्यादी घाबरून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असता आरोपी आडवा झाला फिर्यादीने आरडा ओरडा केले असुन आजुबाजुचे लोक आले व आरोपीस घराबाहेर काढले. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरुन पो.स्टे. मौदा येथे आरोपीविरुध्द […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!