मुंबई :- आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, अधिकारी व कर्मचारी आदींनीही त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.