नागपूर :-डागा स्मृती शासकीय रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नागपूर यांच्यावतीने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक पार पडली. निवडणूक अधिकारी सुनील दहागाये यांनी कामकाज पाहिले. त्यामध्ये जाहीर झालेला निकाल खालील प्रमाणे:देवेंद्र चंदेल, धर्मपाल बागडे, किशोर वाटकर मोहितकर, कादिर अब्दुल्ला, अशोक निखारे, आणि संजय खोब्रागडे हे विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे बिनविरोध निवडणुकीत अनुपमा साठे, संगीता मेश्राम, राजू बैस्वारे, आणि मनीषा भक्ते यांचा सहभाग आहे.
या निवडणुकीत सुनील कोल्हे, नरेंद्र अरमरकर, दिलीप हडप, संजय मानवटकर, दिलीप पाटील, वासुदेव निकोसे आणि वैशाली सहारे यांनी अथक परिश्रम घेतले. असे प्रचार सचिव धर्मपाल बागडे यांनी प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली.