(स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई)
नागपूर :-पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाऱ्या वलनी परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार हनीफ उर्फ इलू हफीज अंसारी, वय २७ वर्ष, रा. वार्ड नं. ०६, बलनी, पोस्टे खापरखेडा हा मागील ४ वर्षापासून वलनी, पिपळा, डाकबंगला, चनकापूर, खापरखेडा, पारशिवनी या परिसरात गुंडगिरी करून नागरिकांना त्रास देत होता. तो नेहमी गुन्हेगारी कृत्यात गुंतलेला असायचा खापरखेडा परिसरात साथीदारांसह कट रचुन खुन करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन शासकीय कामात अडथळा निर्माण करून जिवे मारण्याची धमकी देणे, साथीदारांसह रेती चोरी करणे, कोळसा चोरी, बेकायदेशीर जमाव जमवुन शासकीय सेवकास मारहाण करून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणे सारखे गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. त्याच्या असामाजिक कृत्याची माहीती पोलीसांना देणाऱ्या लोकांमध्ये तो भय निर्माण करून दहशत पसरवित असतो. नागपूर ग्रामीण पोलीसांना त्याचेविरुध्द जेव्हा जेव्हा तक्रारी प्राप्त झाल्या त्या त्या वेळी गंभीर दखल घेवून त्याचेविरुद्ध गुन्हे नोंद केले व त्याला अटक करुन कारागृहात पाठविले आहे. परंतु हनीफ याचे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये सुधारणा झाली नाही. त्याचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु हनीफ याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरुच ठेवली. हनीफ याचे कृत्य सामाजिक सुव्यवस्थेला बाधक ठरत असल्याने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण कडुन MPDA कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली. दि. २९/०५/२०२३ रोजी जिल्हाधिकारी, नागपूर यांनी हनीफ उर्फ इलू हफीज अंसारी याचे विरुद्ध स्थानवता आदेश काढला त्यानुसार त्याला मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे १ वर्षाकरीता स्थानबन्द केले.
सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, प्रविण मुंडे ठाणेदार पो.स्टे. खापरखेडा, तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे, पोलीस हवालदार निलेश बर्वे, विजय डोंगरे, पोलीस स्टेशन खापरखेडा येथील शैलेश यादव, आशिष भुरे, शाम रामटेके, पोलीस नायक प्रदीप मने, मुकेश वापाडे, राजु भोयर यांनी पार पाडली.