सावनेर : स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयात रा. तु. म. नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवाच्या निमित्याने व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पराग निमिषे, विशेष अतिथी हेमंत खोरगडे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचनविभाग तर प्रा. डॉ. विलास डोईफोडे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख मुख्य वक्ते म्हणून हजर होते. महाविद्यालयातील “स्टुडंट सेमिनार अँड गेस्ट लेक्चर” समितीच्या वतीने “सम कोर्सेस अँड करिअर ऑप्शन्स फॉर सायन्स ग्रॅज्युएट्स” या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांनी आधुनिक अभ्यासक्रमांचा सुद्धा विचार करावा, राष्ट्रीय पातळीवर आयोजित जॅम आणि सी. यु. आय. टी. सारख्या प्रवेश परीक्षांची सुद्धा तयारी प्रथम वर्षांपासूनच करावी, योग्य नियोजन आणि मेहनतीने प्रतिष्ठित केंद्रीय संस्थांमध्ये प्रवेश शक्य आहे असे आवाहन प्रा. डोईफोडे यांनी केले.
इंटरनेट च्या युगात विद्यार्थ्यांनी वाचन, निबंधलेखन, वक्तृत्व याला महत्व देऊन व्यक्तिमत्वात भर घालावी असे प्रतिपादन खोरगडे यांनी केले. प्राचार्य निमिषे यांनी संवाद कौशल्य प्रभावी करण्याकरिता सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन समिती समन्वयक प्रा. डॉ. प्रदीप आठवले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता प्रा. रवींद्र भाके, प्रा. प्रकाश काकडे, प्रा. सुनील डोंगरे, प्रा. मिलिंद बरबटे, प्रा. अमिता वाटकर, प्रा. रजतकुमार बॅनर्जी, प्रा. प्रवीण दुलारे, प्रा. परीक्षित चौधरी, प्रा. विलास देशमुख, विलास सोहागपुरे, हेमंत पोहकार, राजू धुर्वे, किशोर मानकर, राजाराम तागडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अनेक विद्यार्थ्यांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.
विद्यापीठ शताब्दी महोत्सवाच्या निमित्याने व्याख्यानाचे आयोजन..
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com