संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27:- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बजरंग पार्क परिसरात दुचाकीमधून पेट्रोल चोरी करताना प्रत्यक्षदर्शी पाहल्यावर फिर्यादी व आरोपीमध्ये झालेल्या भांडणातून आरोपीने फिर्यादीच्या कपाळावर तसेच कानाच्या वर धारदार तलवारीने वार करून गंभीर जख्मि केल्याची घटना गतसायंकाळी 5 दरम्यान घडली असून जख्मि फिर्यादीचे नाव सुरेश उके वय 50 वर्षे रा बजरंग पार्क कामठी असे आहे तर यासंदर्भात जख्मिने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मोहम्मद अब्बास हैदरी वय 22 वर्षे रा बजरंग पार्क कामठी विरुद्ध भादवी कलम 324 अनव्ये गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेत आहे.
पोलिसांनीं दिलेल्या माहितीनुसार नमूद घटना तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या घरासमोर राहणारे असून फिर्यादी यांनी त्यांच्या पुतण्याच्या मोटरसायकल मधून आरोपी यांना पेट्रोल चोरताना पाहिले व आरोपीस हटकले तसेच आरोपीच्या आईस सदर घटने बाबत माहिती दिली याचा राग मनात धरून आरोपी याने फिर्यादीच्या दुकानासमोर जाऊन फिर्यादी यांना अपशब्द बोलला त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीच्या घरी जाऊन आरोपीच्या आईला तुमच्या मुलाला समजावून सांगा असे सांगितले व फिर्यादी वापस घरी येत असताना त्यांच्या पाठीमागून आरोपी आला व फिर्यादी यांनी मागे वळून पाहिले असता फिर्यादीच्या कपाळावर डाव्या कानाच्या वर तलवारी सारख्या तीक्ष्ण हत्यारांने मारून फिर्यादीस जखमी केले .यासंदर्भात जुनी कामठी पोलिसांनी आरोपीस अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.