संदीप कांबळे,कांबळे
कामठी ता प्र 25 :- तथागत बुद्धाच्या धम्म क्रान्तीनंतर चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी धम्मक्षेत्रातील अग्रगण्य असनाऱ्या विचारांना भिक्खुसंघाला नवा आयाम देऊन शिलालेख चैत्य आदी निर्माण करुण धम्मक्रातीला गतीमान केले. त्याच्या कर्याची प्रचिती जनसामान्य लोकापर्यत पोहचविण्याचा प्रयत्न व्हावा यासाठी सम्राट अशोक नागरी सहकारी पत संस्था विविध उपक्रमांसह लोकोपयोगी करण्याचा मानस दृष्टि समोर ठेऊन सम्राट अशोक सम्यक पुरस्कार दरवर्षी देण्यासाठी कटीबंद्ध आहे असे मत परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समीती दिंक्षाभुमी चे विश्वस्त भदंत नाग दिपंकर स्थविर यांनी केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृह मुकुंदराव आंबेडकर चौक हरदास नगर लष्करीबाग नागपुर येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. सहकारक्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तीमंत्व हरदास नगर अर्बन क्रेडिट को आपरेटिंव सोसायटी चे अध्यक्ष के बी मंडपे आंबेडकर चळवळीतील बाबांचे शिलेदार या ऐतिहासिक ग्रथाचे संपादक अॅड हंसराज भांगे आणी सम्राट अशोक नागरी सहकारी पत संस्था चे आधारवड राहिलेले स्मृतीशेष डॉ अनुप काबंळे यांना मरनोत्तर सम्राट अशोक सम्यक पुरस्कार भदंत नाग दिपंकर स्थविर यांच्या हस्ते देण्यात आला.
उपरोक्त कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी सम्राट अशोक नागरी सहकारी पत संस्था चे अध्यक्ष अॅड महेंद्र बन्सोड हे होते कार्यक्रम चे संचालन संस्थेचे उपाध्यक्ष शशीकात कांबळे यांनी केले कार्यक्रम प्रसंगी मोठ्या संख्येत संस्थेचे पदाधिकारी सदस्य अभिकर्ता भागदारक सह डॉ बाबासाहेब आंबेडकर मिशन बहुजन हिताय संघ आदी क्षेत्रातील अग्रगण्य नागरिक उपस्थीत होते आभार प्रदर्शन अॅड उमेश जाधव वाघमारे यांनी केले.
सम्राट अशोक यांचे अद्वितीय कार्य जनसामान्यापर्यन्त पोहचविने काळाची गरज-भदंत नाग दिपंकर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com