संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांनी वडिलाच्या निधनानंतर मराठा राज्याचा कारभार सांभाळला. त्यानंतर 1681 ते 1689 अशी नऊ वर्षे त्यांनी दुसरे छत्रपती म्हणून राज्य केले. छत्रपती संभाजी महाराज हे धगधगती आग होते असे मौलिक प्रतिपादन नायब तहसीलदार अमर हांडा यांनी कामठी तहसील कार्यालयात संभाजी महाराजांना अभिवादन करतेवेळी व्यक्त केले.यावेळी प्रस्तुतकार अमोल पौड,भुपेंद्र निमकर, गजेंद्र वंजारी,राम उरकुडे, कुंजीलाल पानतावणे आदी उपस्थित होते .